गंगाबाईचें सिद्धान्न

संकीर्ण वाड्मय साहित्य.


( श्री. पां. मा. चांदोरकर )
१ आजपर्यंत निदान ७।८ स्त्रीकवि आपल्या परिचयाचे झाले आहेत, आज आणखी एकाची ओळख होत आहे.
२ मला एका बाडांत या गंगाबाईचा एकच अभंग सांपडला. अभंग गोड आहे. गंगाबाईच्या गुरूचा वा कालाचा त्यावरून कांहीं बोध होत नाहीं. पुढेंमागें शोध लागेल. असो.
३ अभंग खालीलप्रमाणें :-
भक्तीचें ऊखळ : भावार्थी मूसळ : सडीले तांदूळ : विवेकाचे ॥१॥
प्रपंचाचा कोंडा : काहाडोनि टाकिला : कण निवडीला : स्वरूपाचा ॥२॥
भक्तीचीया पात्रीं : आधण ठेविलें : विंधन जाळीलें : कामक्रोध ॥३॥
मदनाचा ऊत : आला अवचिता : अ(नु)भव शिंपिता : शांत केलें ॥४॥
भक्तीचीया पात्रीं : अन्न हो वाढीलें : जेवणार भले : सनकादीक ॥५॥
गुरूचें शेशान्नीं : बैसली गंगाबाई : आम्हासी प्राप्ति ही : कैसी होय ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP