मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संकीर्ण वाड्मय साहित्य| नाथगोपाळाचे सुलतान संकीर्ण वाड्मय साहित्य चरित्र मराठी जंगनामा बालवीर कासीमचा पराक्रम एक स्त्रीरत्नाचा पराक्रम कूट अभंग कानडी रिवायत उर्दु रिवायत गोधडी दास कविकृत सखु चरित्र मालिका ज्ञानराज माउली आर्याबद्ध शकुनवंती विप्र गोविंदकृत शिल्पशास्त्र माधवेंद्रकृत अनुभयोदय दामा कोंडदेवकृत सिद्धांतसार मतिप्रकाश गंगाबाईचें सिद्धान्न नाथगोपाळाचे सुलतान श्री. ना. गो. चापेकरकृत कांहीं गाणीं तुका विप्रकृत कांहीं कविता भक्तीपर श्लोक नाथगोपाळाचे सुलतान संकीर्ण वाड्मय साहित्य. Tags : marathisahityaमराठीसाहित्य नाथगोपाळाचे सुलतान Translation - भाषांतर ( श्री. पां. मा. चांदोरकर )१ माझ्या जवळील एका हस्तलिखित बाडांत खालील कविता आहे. कवितेच्या शेवटीं “ नाथ गोपाळ निर्गुण बाही : केला सुलतान आक्षईं ” आसा उल्लेख आहे. २ कविता अशी श्री चतुर्दळीच्या चवघी जणी : साहा सखया स्वाधिष्ठानीं : दहा मणिपुरीच्या कामिनी : अनुहातीच्या द्वादश गडनी : नेणो म्हणती तो वीतरागी : १ : वीशु (?) दलीच्या नारी सोळा : अग्नी चक्रीच्या दोनी बाळा : त्रिपुटीसी देखिले डोळा : ब्रह्म देवो ब्राह्मण मेळा : तेथें गेले मी लगबग ही : २ : श्रीहाटीचा सारंगधर : गोल्हाटीचा गौरीहर : आउट पीठीचा विस्वंभर : भ्रमरगुंफेचा विचार : सदा सीव उन्मनी भोगी : ३ : ब्रह्मरंध्रीची सत्रावी : चढले सहस्रदळ गावी : पुढें देखिला गोसावी : माजी सरली ठेवाठेवी : माया सरली न सिवे आंगीं : ४ : जेथें शब्द वाचा नाहीं : तेथें अद्भुत कांहीं न बाई : नाथ गोपाळ निर्गुण बाही । केला सुलतान आक्षईं : सद्गुरु रुपे सायोज्य भोगी : ५ : कोणी शुधी सांगा मजलागी : बाई कोठें तो निजयोगीं : धृ० : ३ गोपाळनाथ चार झाले. (१) रंगनाथ शिष्य गोपाळनाथ (१६८८). (२) देवनाथ शिष्य गोपाळनाथ (१६७६-१७४३). (३) देवनाथांचे परमगुरु गोपाळनाथ (१६००). (४) आत्माराम शिष्य गोपाळनाथ. तेव्हां वरील चार गोपाळनाथांपैकीं सुलतानाचे गुरु कोणते गोपाळनाथ ? नक्की समजत नाहीं. सुलतान ( नाथ ) यांनीं नाथपंथाचा आवडता विषय जो पातंजल योग तोच वरील कवितेंत गायिला आहे, हें साहजिकच आहे.४ कसेंहि असो, आज सुलतान हे संत - कवि आपल्याला नवीन उपलब्ध होत आहेत. वर जे गोपाळनाथांचे काल दिले आहेत त्यावरून व सुलतानांच्या भाषेवरून सुलतान ( नाथ ) हे सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात व अठराव्याच्या पूर्वार्धांत केव्हांतरी झाले असें अनुमान काढण्यास कांहीं हरकत असूं नये. N/A References : N/A Last Updated : March 26, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP