TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

आर्याबद्ध शकुनवंती

संकीर्ण वाड्मय साहित्य.


आर्याबद्ध शकुनवंतीची आणखी एक प्रत
( प्रि. दा. के. ओक, नागपूर )
ही आमच्या संग्रहीं पुष्कळ वर्षांपासून आहे. ‘ काव्यसंग्रहा ’ चे संपादक ( आमचे पितृव्य ) कै० वामन दाजी ओक यांस ही इ. स. १८९४ मध्यें होडावडें ( सावंतवाडी संस्थान ) येथील प्राचीन मराठी काव्यांचे भक्त श्री० भगवंत बाळकृष्ण पै रायकर यांनीं पाठविली होती. त्यांनीं ती शहापुर ( बेळगांव जवळील ) येथील सद्गृहस्थ रा. रा. माधवराव वासुदेव नाईक सराफ ह्यांच्याकडून मिळविली होती.
ही शकुनवंती भारत - इतिहास - संशोधक - मंडळाच्या त्रैमासिकाच्या वर्ष १० अंक २ मध्यें ( जुलै - सप्टेंबर १९२९ ) छापली आहे. तथापि प्रस्तुत प्रतींत कांहीं सुबोध पाठ असल्यामुळें, व छापील व प्रस्तुत प्रतींतील आपपाठ काढून टाकून ह्या दोहींच्या साह्यानें एक शुद्ध प्रत तयार करितां येण्यासारखी असल्यामुळें, ही प्रत मंडळास सादर करीत आहें.
ही मोरोपंतरचित आहे, अशी समजूत आहे. परंतु भाषाशैलीवरून ती पंतकृत नव्हे हें दिसून येतें. शिवाय, ही रचना नृसिंहोपासक असावा, असें शेवटच्या आर्येवरून दिसतें, तथापि ही कोणीं व केव्हां रचिली ह्यासंबंधीं शोध लागल्यास कोणत्या काळांतील लोकांचा शकुनांवर विशेष भरंवसा होता, हें कळेल. बहुधा बाजीराव पेशवे ( दुसरे ) ह्यांच्या कारकीर्दीत ही रचिली असावी.

आर्याबद्ध शकुनवंती

अतिशय सत्वर होइल तव चिंतित कार्य सत्य वाक्य मनीं ।
मानुनि निज दैवत पदि व्हावें तत्पर सदा सुखें नमनीं ॥१॥
प्रश्न सफल होइल परि विलंब बहुधा विशेष वाटतसे ।
श्रमसाध्य सत्य मानुनि प्रयत्न करणें अवश्य घेउं तसें ॥२॥
श्रीजगदीश्वर तव प्रश्न करिल सिद्ध हर्ष होइलसा ।
करुणार्णव रघुपति तो साह्य करिल सर्व क्लेश जाइलसा ॥३॥
बहुधा न घडल वाटे कार्य परंतू प्रयत्न कर बरवा ।
हटवुनि प्रारब्धगती जगतां मद्यत्न हा प्रमुख ठरवा ॥४॥
घडलें कार्य, कशास्तव संशय करितां उगेंच, स्वस्थ असा ।
हरिभजनीं तत्पर व्हा पुनरपि कधिंही नयेच प्रश्न असा ॥५॥
घडणें कठीण दिसतें कार्य मला हें बहूत विबुधवरा ! ।
यास्तव चिंतन निजमनिं न करुनि इच्छेप्रती बरें लवरा ॥६॥
सफल मनोरथ असतां प्रश्न कशाला उगाच विफल करी ।
स्वगृहिं जरि विक्रय तरि कशास व्हावी दुकानची विकरी ॥७॥
अतितर प्रयत्न करितां प्रश्न सफल परि असे विलंब बहू ।
स्मरतां हरिनारायण कार्य घडे इच्छिसी तासेंहि बहू ॥८॥
प्रयत्न करितां देतो जगदीश्वर फल तसेंच उघड असे ।
मन याचें, ‘ स्तव करणें प्रश्न सफल वाटतें खचीत ’ असे ॥९॥
प्रश्नावरि मन ठरवुनि प्रयत्न विसरूं नका त्वरीत करा ।
होइल प्रश्न सफल शुभ आनंदें रत्न - भूम सर विखरा ॥१०॥
समय उचित पाहुनि मग प्रश्न करिल जरि सुबुद्ध नर साचा ।
शुभाशुभाचा अनुभव त्यानंतर एकनिष्ठ दासाचा ॥११॥
फारच सत्वर होइल कार्य मनेप्सित अलभ्य लाभ घडे ।
घडिघडि स्मरण करावें हरिनारायण अनिष्ट तें बिघडे ॥१२॥
हर्षित तनुमन होतें श्रवण करी प्रश्न सफल तव चिंता ।
जाइल दिगंतराप्रति जगदीश्वर वासुदेव मनिं चिंता ॥१३॥
करितां बहुत परिश्रम जाइल सिद्धीस प्रश्न अवघड तो ।
हा तर सुसाध्य आहे यास्तव मज वाटतें त्वरित घडतो ॥१४॥
तव चिंतन मज निष्फल दिसतें, नरवर शिरोमणी याची ।
आशा किमपी न करीं परि इच्छा धरि - समर्थ - पायांची ॥१५॥
श्रीमद्रमारमणपदिं शरण असुनि कार्य हें न होय कसें ? ।
यास्तव स्वस्थ करुनि मन वर्ता, रक्षिल हरीच अर्भकसें ॥१६॥
करुणासागर प्रभु तो साह्य करुनि कार्य हें करील खरें ।
तच्चरणीं मन असतां पालक सगळें सत्य त्वरित विखरे ॥१७॥
प्रतिकूल काल असतां घडणें मनकामना कठीण दिसतें ।
परि अति दुर्धर आशा न सुटे, हृदयांत तेंच तें नसतें ॥१८॥
श्रीहरिवरप्रसादें अवघड जें कार्य तें सुलभ घडतें ।
मग जें सुसाध्य असतें तद्विषयीं मन कशास गडबडतें ? ॥१९॥
‘ नरहरि ! माझें इच्छित सफल करीं ’ हेंच मागणें तुजला ।
श्रवण करुनि मम वाक्य प्रसाद दिधला अलभ्य हा मजला ॥२०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-03-26T04:49:14.9230000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

भल्लाट

  • n. (सो. पूरु.) एक पूरुवंशीय राजा, जो मत्स्य के अनुसार विश्वक्सेन का, एवं वायु के अनुसार, उदक्सेन राजा का पुत्र था । भागवत में इसके लिये ‘भल्लाद’ पाठभेद प्राप्त है । 
RANDOM WORD

Did you know?

पंचप्राणांना भोजनापूर्वी आहुती का द्यावी ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.