कूट अभंग

संकीर्ण वाड्मय साहित्य.


ज्ञानदेव, तुकाराम प्रभृति कवींचे जसे आध्यात्मिक कूट अभंग आहेत. तशा मुसलमान कवींनींहि कूट प्रश्नाच्या रिवायती केल्या आहेत. नमून्यादाखल त्यांतील एक रिवायती येथें देतों -

सवाल

हासेन - हुसेन बंधु कोन ॥ श्रीहारि सांगा निवडुन ॥
आणखी पंडिता सांगा कोन ॥ प्रश्न उघडावा सुज्ञान ॥
जगनमाताहि कोन व्याली ॥ म्हणावा बाप कोन आली ॥
मुले कैशि हारनी मेली ॥ यजिदें सांगा कोन वाली ॥
न्हवते करबलाचे रण ॥ सांगावे कोण कारण ॥
कसे म्हणावे करून म्योन ॥ जिवें गुरु पुत्रा कारण ॥
फकिर तुम्हीं झाला कैसे ॥ उगीच घेतली सोंगे जैसें ॥
जन म्हणतिल वेडे पिसें ॥ मूळ बिज सांगा असेल तैसे ॥
हातिं घेतला तुम्ही झेंडा ॥ वरि लावला लाल गोंडा ॥
हातिं बांधिला तुम्ही कंडा ॥ कुणी केला हो तुला मुंडा ॥
गळ्यांत घालुन तुम्ही शैली ॥ पैलि सवलि कसि केली ॥
दोन करि दोन गजर घाली ॥ पिवळी पिवडिहि लाविली ॥
हाति घेतला तुम्ही सोटा ॥ कोन मंत्र तो लंगोटा ॥
डोक्यावरती हिरवा दुपटा ॥ कुणाचा तु कोन फकिर बेटा ॥
घेतली काकेमधें झोळी ॥ “ बाई मो ” म्हणून देतो हारळी ॥
आंगारा पुडि ठेवि तो जवळी ॥ नाहि ठाऊक कर्मजाळी ॥
राजे बापु तो कवि म्हणे ॥ दाताने लोहचणे खाणें ॥
न्हवे ते पिठल फुटाणे ॥ गटागट घेऊनि बसुन खाणे ॥

उत्तर

हासन - हुसन बंदू दोन ॥ ब्रह्मांडीं चंद्रसूर्य जान ॥
पिंड जानावे दोन नयना ॥ जिवशिव आत्मज्ञानाचि खुन ॥
इच्छा मायाहि व्यालि ॥ निजानंद कंद फळें आलीं ॥
कर्म कर्बलीं रणी मेलि ॥ सखा चुलता तो घाला घालि ॥
फकिर आम्ही चैतन्याचे कोंब ॥ सगुन रुपि मारि जीवें बोंबा ॥
दिलें मायेनें खोटें सोंग ॥ माझें निर्गुन आहे आंग ॥
कीर्तीचा करि घेऊन कंडा ॥ च्यार वेदाचा वारि गोंडा ॥
आत्मज्ञानाचा करिं कंडा ॥ मन मारुन झालों मुंडा ॥
निरगुण रुपाची केली सयली ॥ रामनामाचे गजरें घाली ॥
कामक्रोधाची पिवडी ल्याली ॥ सुगुन होऊन घाला घालि ॥
हातिं हांकार घेऊन सोटा ॥ माया मोहाचा लंगोटा ॥
सोहं मंत्राच्या आलो वाटा ॥ काहो सगुनि करि बोभाटा ॥
निजसुखाचे डोई छात्र ॥ सगुण रुपी हो झालो पात्रं ॥
झोळी चिन्मय बगलिं मात्रा ॥ बळकट बांधिली विषयसूत्रा ॥
भावभक्तीचा आंगारा ॥ घरोघरि केला डांगोरा ॥
जिव मायेच्या जिव पोरा ॥ कर्म येजीद घालि घेरा ॥
कर्म भोगुन तुष्ट झालो ॥ दुष्ट शत्रू हिनकी गेलो ॥
होणे होते तसे झाले ॥ मुर्खाला कळेना तसे झाले ॥
राजे बापू तो म्हणे कवि ॥ ज्ञानाचा र्‍हाईल उगवे रवि ॥
सगुन रूप निर्गुनाला मिळवि ॥ हाति येईल तुझ्या ठेवि ॥

प्रस्तुत काव्यांत बंधुप्रेम वगैरे उच्च भावनांचे दाखले विपुल आहेत. त्यापैकीं मातेच्या पुत्रवत्सलतेचा एक दाखला येथें नमूद करतो -

फातिमा रडोनी म्हणे आहे रे जगपाळणा ॥
माझा पुत्र बा हुसेना युद्धासि गेला रणा ॥
जाउनि दाखल झाले वैरिहि तिथें आलें ॥
हाति घेऊनिया भाले या म्हणे आता हुसेना ॥
भाऊ हे कसले तरि भावाच्या कंठि सुरि ॥
कापे थरथरा रक्त पाहुन हुसेना ॥
येमहि तीथें आले बघुनी रडूं लागले ॥
पक्षी तिथे धडधडे बानू म्हणे परि हुसेना ॥
आंत वृक्ष गडगडे जगहि दुःखानें रडे ॥
मीन जैसा तडफडे याज परि हुसेना ॥

x    x    x    x    x    

रंगित पाळना हौसन केला ॥ रेसमी दोर्‍या लाउनि त्याला ॥ माझा झुलनार निघुन गेला । आता हालऊन बघुं कुनाला ॥१॥
माझ्या बाळाची हौस मोठि ॥ दागिना मोडुन केलि पेटी ॥ माझा झुलनार निघुन गेला । आता हालऊन बगु कुनाला ॥२॥
आंगडें टोपडे आसगराला ॥ पिंपळपान शोभे कपाळाला ॥ माझा लेनार निघुन गेला ॥ हाता हालउन बगु कुनाला ॥३॥
आसगर माझा लहान होता ॥ पौर्णिमेचा चंद्र दिसत होता ॥ माझा झुलनार निघुन गेला ॥ आतां हालऊन बगु कुनाला ॥४॥
पोक्त रिवायत गमाचि झाली ॥ गरिब आबदुल यानें केली ॥ राजे भास्कराची दया झाली ॥ गरिब आबदुल याने केली ॥५॥
निव्वळ उर्दू व कानडी या भाषांतहि कांहीं रिवायती केल्या आहेत. त्यांचा एकेक नमुना उदाहरणादाखल नमूद करितों.

N/A

References : N/A
Last Updated : March 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP