बालवीर कासीमचा पराक्रम

संकीर्ण वाड्मय साहित्य.


इमाम हुसेनचा पहा चिरंजीव कासिम अज्ञान होता ॥ ऐका हो सारे चित्त लाउनि किरत सांगतो त्याची आतां ॥ नऊ वर्षाच्या वयामध्यें लग्नाचा सौंव्हार झाला होता ॥ मुळ आरंभी त्याच कपाळी ब्रह्म्यानें आक्षर लिहीला होता ॥ त्याचे लग्नाचि झालि तयारी नवर्‍यासि भासिंग बांधला होता ॥ मांडवामधें वया लाऊनि बावल्यवर नवरा बसला होता ॥ वैर्‍याचा इतक्यांत आला सांगावा युद्धासि तुम्ही आता ॥ कसा कोपला भगवान् रडत होति त्याची माता ॥ कासिमसाहेबानी ऐकुनशानी केलि तयारी ऐक आतां ॥ चुलत३ हो त्यांचे हुसेनसाहेब आज्ञा त्यासी मागीत होता ॥ म्हणे हुसेन साहेब बाळा लहान तू आज्ञा मि देऊ कसि आतां ॥ नको रे बाळा जाऊ रणावर वैरि मोठा हाय सारस्ता ॥ तेव्हां चुलत्यासि म्हणाले कासिम मिच रणावर जाणार आता ॥ आज्ञा मजला द्यावे म्हणोनि चुलत्यासि तो विनवित होता ॥ यजिएअखान झाला बैमान रनावर डंका वाजवित होता ॥ त्याचाच भाऊबंद परंतु त्यासि वैरि झाला होता ॥ रणशूर बाहदर जाऊन वैर्‍यासि तो झुंजत होता ॥ पाणी पाणी म्हणुनशानी कंठ सोकुनि गेला होता ॥ रामनामाचा ध्यास करुनि दुष्ट वैर्‍यासि लढत होता ॥ बाण जोडुनि धनुष्यासि एक एकासि मारित होता ॥ पाण्यावाचुन प्राण घेतला स्वर्गी गेला माझा स्वामि आतां ॥ दारा त्यासि शरण जाउनि सभेस म्हणतो ऐका आता ॥ त्यांच्या दुःखानं उर दाटला म्हणुन करितो पुर कथा ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP