मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संकीर्ण वाड्मय साहित्य| एक स्त्रीरत्नाचा पराक्रम संकीर्ण वाड्मय साहित्य चरित्र मराठी जंगनामा बालवीर कासीमचा पराक्रम एक स्त्रीरत्नाचा पराक्रम कूट अभंग कानडी रिवायत उर्दु रिवायत गोधडी दास कविकृत सखु चरित्र मालिका ज्ञानराज माउली आर्याबद्ध शकुनवंती विप्र गोविंदकृत शिल्पशास्त्र माधवेंद्रकृत अनुभयोदय दामा कोंडदेवकृत सिद्धांतसार मतिप्रकाश गंगाबाईचें सिद्धान्न नाथगोपाळाचे सुलतान श्री. ना. गो. चापेकरकृत कांहीं गाणीं तुका विप्रकृत कांहीं कविता भक्तीपर श्लोक एक स्त्रीरत्नाचा पराक्रम संकीर्ण वाड्मय साहित्य. Tags : marathisahityaमराठीसाहित्य एक स्त्रीरत्नाचा पराक्रम Translation - भाषांतर जंग घ्यावे आतां ऐकून ॥ होति फार बहादर जैतून ॥ पटाईत होती ति पैलवान ॥ नित्य हिंडती पांच हात्यार घेऊन ॥ पुरशाचा पोशाक घेऊन ॥ नित्य लढाई करिति धाऊन ॥ अंगे आपलि फौज ति घेऊन ॥ एके दिवशीं निघालि सिनगार करुन ॥ जंग घ्यावे आतां ऐकून ॥ होति फार बहादर जैतून ॥ पुढं पुरषाला ति पाहुन ॥ फार भंड करि त्यास न्हेऊन ॥ कैकाला टाकले मारून ॥ नौरि पळत आसे नित्य दचकून ॥ ति खबर महंमदे हानिप ऐकून ॥ आले जैतूनवर चालून ॥ भेट झाले म्हणाले आसें जैतून ॥ आहेस कवणांचा तु कौन ॥ जंग घ्यावें आतां० ॥ध्रु०॥महंमद हानीप म्हणाले कडकडून ॥ मि महमद हानिप आलो चालून ॥ मौलाचा पुत्र आलि सुग्रीवान ॥ ऐकून तप्त झालि जैतुन ॥ कर वार म्हणाले पुढें येऊन ॥ तेव्हां जसे सांगितले महमएद हानिपान ॥ तु नार आहेस घे उमजून ॥ कसे वार करू तुजवर धाऊन ॥ जंग घ्यावे० ॥ध्रु०॥मग म्हणाले हानिपाला जैतून ॥ नार म्हणून कसि धरलि तुम्ही खूण ॥ महमद हानिप म्हणाले वळकून ॥ नाहि रिकाबे मध्यें पाय जुळुन ॥ थलथल ते गे तुझे दोने जोबन ॥ आम्ही पाहिली आता त्रिभुवन ॥ ति नार केली वार सुदसन ॥ लागला वार डोईवर जाऊन ॥ जंग घ्यावे० ॥ध्रु०॥पडले महंमद हानिप भुल येऊन ॥ घोड्यावरून उतरली जैतून ॥ नाहि जिवाची खबर झाला गमन ॥ ऐकावे म्हणे धड ह्याचे कापुन ॥ हात लाऊन पाहिले हालवुन ॥ काय हासिल मऎड्याची मान कापुन ॥ प्राण गेला म्हणुन दिले सोडुन ॥ च्यार स्वार होते नेले धरून ॥ जंग घ्यावे० ॥ध्रु०॥बापापासि जैतुन जाऊन ॥ उभा र्हायली बहादारि सांगुन ॥ महमद हानिपाला आले मि खपऊन ॥ च्यार स्वार आणिले हात बांएधुन ॥ बाप म्हणाला ऐक आता जैतुन ॥ महमएद हानिपाला मारणार आहे कोण ॥ खरे वाटेना बोलने तुझे आजुन ॥ सिर घेऊन ये जा मान कापुन ॥ जंग घ्यावे० ॥ध्रु०॥घ्या मागची हाकिकत ऐकून ॥ महमद हानिप पडले घोड्यावरून ॥ एक गुलाम होता मकबुल म्हणुन ॥ तो बसला होता तिथे दडून ॥ सर्व हकिकत सांगुन ॥ महमद हानिपाला उठविले जाऊन ॥ फार खजिल झाले घरि येऊन ॥ मातोसरिने रागें भरले ऐकून ॥ जंग घ्यावे० ॥ध्रु०॥मी मौला आलि वर लढून ॥ सात दिवस र्हाइले वाचून ॥ आसल्याचा पुत्र तू पैलवान ॥ कसा पडलास भुईवर भुल येऊन ॥ आई निजली होति दोन प्रहरि जेऊन ॥ हानिप निघाले मुकबुलला घेऊन ॥ आई निजून उठली हाडबडून ॥ मुलगा दिसेना झाला पाहाति हुडकुन ॥ जंग घ्यावे० ॥ध्रु०॥मि उगिच म्हणालि त्याला दुखऊन ॥ तो खचित गेला मला लाजून ॥ निघाली घोड्याला जिन घालुन ॥ गेलि सडकेचा मार्ग नीट धरुन ॥ तिकडुन येत हुती जैतुन ॥ भेट झालि पाहिली हानिपान ॥ दोघिची लागलि छनापन ॥ जैतुन वार मारलि जपुन ॥जंग घ्यावे० ॥ध्रु०॥बिबि हानिपाची ढाल तुटुन ॥ चार बोट सिरलि डोक्यात जाऊन ॥ मकबूलास म्हणाले महमद हानिपान ॥ डोंगरावर चढून पहा मार्गान ॥ पाहिले सवारास मकबूलान ॥ चला जलदि आली जैतून ॥ घटकेत पोंचले जाऊन ॥ मातोसरीस पाहिले जाऊन ॥ जंग घ्यावे० ॥ध्रु०॥जैतुन आलि पुढें धावून । केलि वार घेतले चुकवून ॥ मग धरुन जैतूनाला हानिपान ॥ फेकलि आकाशावर रागान ॥ मातोसरि म्हणाली तेव्हां वरडून ॥ धर वरच्यावर जाईल प्राण ॥ माझे दुध तुला बक्षीस करीन ॥ न धरल्यास श्राप तुला देईन ॥ जंग घ्यावे० ॥ध्रु०॥धरलि आदर कडिवर घेऊन ॥ तेव्हां जैतुन म्हणालि लाजून ॥ मला भेटला न्हवता कोनि आजुन ॥ कलमा वाचून झाली मुसलमान ॥ मातोसरिला म्हणाले हानिपशान ॥ हात बांधुन हवाली केलि जैतुन ॥ जावा घरला सर्व तुम्ही निघुन ॥ च्यार स्वार आनतो माझे जाऊन ॥ जंग घ्यावे आता ऐकून ॥ होति फार बहादर जैतून ॥ N/A References : N/A Last Updated : March 26, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP