माधवेंद्रकृत अनुभयोदय

संकीर्ण वाड्मय साहित्य.


( श्री. पांडुरंग मार्तंड चांदोरकर )
सूचींत या कवीचें नांव नाहीं आणि अनुभवोदय या ग्रंथाचेंहि नांव नाहीं. मीं मागें या कवीची कांहीं ( अभंग, पदें, आरत्या वगैरे ) त्रोटक कविता मंडळांत वाचली आहे. तिच्या वरून याच अकाल सतरावें शतक दिला होता. महाराष्ट्र - सारस्वतांत याला पेशवाई - अखेरील कवींच्या वर्गांत ढकलिलें आहे ( पृ. ५३२ ). पण नक्की काल ज्यावरून सिद्ध होईल असा पुरावा अद्यापि उपलब्ध झाला नाहीं.
आज याचें एक प्रकरण उपलब्ध झालें आहेत. तें त्रोटक आहे. फक्त पहिलें प्रकरण व दुसर्‍याच्या ७३ ओवीच सांपडल्या आहेत.
ग्रंथ वेदांतपर आहे. भाषा सतराव्या शतकांतील उत्तरार्धाची आहे.
ग्रंथारंभ : श्रीगुरुदत्तात्रयायनमः ॐ नमो सद्गुरुपरोपकारी : ॐ नमो सदुगुर त्रितापसौहरी : ॐ नमो सद्गुरु अवेक्त सूत्रधारी : न कळे महिमा स्वामी ॥१॥
जय जय सद्गुरु भास्करा, जय जय तमांतका अगोचरा : जय जय स्वरूप निर्विकारा । भक्तदासासन्निधीं ॥२॥
गुरु : अवधूतस्वामीच्या कृपेनें : बोबडे शब्द वटवटी ॥८/१॥ ....... दिगंबरा धावी लवलाही : मी अनाथ दीन तुझें ॥४१/१॥ यावरी श्री अवधूत : शिष्याचा पाहोनि मनोगत ... ॥८/२॥ हर्षें बोले दिगांबर ... ॥३३/२॥ दीगांबरकृपा अवलोकन ... ॥७१/२॥ यावरून गुरूचें नांव दिगंबर अवधूत किंवा अवधूत दिगंबर हीं दोन्हीं नांवें सूचींत नाहींत. एकटें अवधूत किंवा एकटें दिगंबर असें आहे. अपिकीं एका दिगंबरानी संतविजय केला आहे. ते दत्तसांप्रदायी व काशीराज - शिष्य आहेत. काशीराज हि दोन आहेत. प्रसिद्ध काशिराज रामानुजी होते. हे काशीराज निराळे आहेत. सारांश, काशीराज - दिगंबर अवधूत - माधवेंद्र यांचा नक्की काल आढळत नाहीं.
६ कवीचें नांव : माधवेंद्र भृत्या करुनी : ॥१००/१॥ माधवेंद्र म्हणे स्वामी .... ॥९/२॥ अवधूत म्हणे माधवेंद्रासी ... ॥२५/२॥ माधवेंद्र अनन्य शरण । अवधूतस्वामीसी ॥६७/२॥ या वरून माधवेंद्र हें कवीचें नांव होय.
७ ग्रंथस्वरूप : ग्रंथ गुरुशिष्य संवादरूप दासबोधा सारखा आहे व त्याचें नांव अनुभवोदय आहे पहिल्या प्रकरणाचा शेवट असा आहे : इति श्रीअनुभवउदये गुरुशिष्यसंवादे प्रकाशभास्कर नाम प्रथम प्रकर्ण ॥ ओव्या साडे चार चरणी आहेत. दासबोधाची छटा बरीच दिसते ( पहा ओवी ४१-४९/१, ५१/१, ५६-५८/१. ६६/१ इ. इ. ) बाजेगिरी, जाईजणे, आत्महत्यारा, हे शब्द दासबोधांत नेहमीं येतात, ते यांतहि आले आहेत. माधवेंद्राच्या काळींहि ढोंगी गुरूंची सांथ होती असें ४०-५०/१ ( नाना मार्ग नाना जल्पना । अधिकोत्तर चावटी जाणा । उदरपोषणीं संशयरचना । जन्ममरण न खंडेचि ॥५१/१ ) या ओव्यां वरुन दिसतें. खरा सद्गुरु कोण : पतीतपावना ब्रीदरक्षका : भक्तांकिता बोधदायका : जगउद्धरणा मोक्षदायका : गुरु सद्गुरु पदवी तुजलागी ॥३०/१॥ पतीतं उद्धराया कारणें : म्हणोनि अवतार स्वीकारणें : गुरु पदवी प्रकट करणें : परमार्थालागी ॥७१/१॥ धर्माचें स्थापन करुनी : शरणांगतांसी उद्धरोनी : निजपद तया अर्पोनि : कैवल्यदाता परिपूर्ण : ॥८३/१॥ अशा सद्गुरुला शरण जाणारा मुमुक्षु कसा असावा : अनुताप संचरला : विषयसुखातें विसरला : पिशाचवत् वर्तला : ..... ॥६१/१॥ अशा मुमुक्षूनें देवाच्या ठिकाणीं आपलें मन कसें जडवावें : कामिकाचें जैसें मन : धनलुब्धकाचें जेवीं ध्यान : तेवीं मद्भक्ताचें आचरण : विकारवंत त्यागी ॥३९/२॥ जीव हीनदशा कां पावला : स्वहितस्थिती भुलोनी ॥८१/१॥ अशाला मोक्ष कसा मिळेल : सावधपणें आचरण : अनित्य त्यजी दवडून : गुरुवचनीं प्रमाण : तो मोक्षयोगे ॥४१/२॥ याप्रमाणें ग्रंथ स्वरुप आहे. काव्य साधारणच आहे.
८ दैवत : उद्धरणमुद्रा घेउनी : बीजें केलें कैवल्यदानी : सैह्याद्रीसिखरीं आसनी : उपविष्ट स्वामी जाले ॥९२/१॥ हें दत्तात्रेय कवीचें दैवत होय.

N/A

References : N/A
Last Updated : March 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP