मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|ऐतिहासिक पर्यालोचन|
मनूच्या मते जबाबदारी व स्त्रीस्वातंत्र्याचा योग

मनूच्या मते जबाबदारी व स्त्रीस्वातंत्र्याचा योग

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


यासंबंधाने मनुस्मृती अध्याय ९ येथे पुढील वचने लिहिली आहेत :
उत्कृष्टायाभिरूपाय वराय सदृशाय च ।
अप्राप्तामपि तां तस्मै कन्यां दद्याद्यथाविधि ॥८८॥
[ प्रयच्छेन्नग्निकां कन्य:मृतुकालभयान्वित: ।
ऋतुमत्यां हि तिष्ठत्यामेनो दातारमृच्छति ] ॥८८अ॥
काममामरणात्तिष्ठेद्गृहे कन्यतुमत्यपि ।
नचैवैनां प्रयच्छेत्तु गुणहीनाय कर्हिचित् ॥८९॥
त्रीणि वर्षाण्युदीक्षीत कुमार्यृतुमती सती ।
ऊर्ध्वं तु कालादेतस्माद्विंदेत सदृशं पतिं ॥९०॥
अदीयमाना भर्तारममिगच्छेद्यदि स्वयं ।
नैन: किंचिदवाप्नोति न च यं साधिगच्छति ॥९१॥
अर्थ : ‘ चांगला, सुंदर व कन्येजोगता ( अथवा सवर्ण ) असा वर मिळत असेल, तर कन्या अल्पवयी असली तरी पित्याने त्यास ती यथाविधी देऊन टाकावी. [ ऋतुप्राप्तीचा कळ जवळ येत चाललेल्या ‘ नग्निका ’ कन्येला ऋतू प्राप्त होण्याची भीती असते, यासाठी तिचे दान करून टाकावे. विवाह न होता ती ऋतुमती राहिली, तर तिचे दान करणारास पातक लागते. ] कन्येला ऋतू प्राप्त होऊन ती जन्मभर जरी घरी राहिली तरी चिंता नाही, परंतु पित्याने गुणहीन वरास ती कदापि देऊ नये. अविवाहित कन्येस ऋतू प्राप्त झाला असता तिने ( आपले दान होण्याची ) तीन वर्षे पावेतो वाट पहावी, व हा इतका काळ लोटून गेल्यावर तिने आपणायोग्य ( अथवा सवर्ण ) असा पति मिळवावा ( = करून घ्यावा ). तिचे दान ( पित्याकडून अगर इतरांकडून ) न झाल्यामुळे ती आपण होऊन पती करून येईल, तर तिला मुळीच पातक लागत नाही, व ती ज्यास वरते तोही पातकी होत नाही. ’

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP