मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|ऐतिहासिक पर्यालोचन|
विराट पुरुष

विराट पुरुष

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


’ विराट पुरुष ’ शब्दाच्या अर्थात फेरफार, व ’ आर्यमंडळ ’ हा अर्थ : पुरुषसूक्तात ’ विराट ’ या संज्ञेचा एक पुरुष मानिला आहे, पण त्याचे स्वरुप सांगताना ते कोणत्याही विशेष प्राणिवर्गापैकी पुरुषजातीय प्राण्याच्या स्वरुपाचे वर्णिले नाही. ’ पुरुष एवेदं सर्व यदभूतं यच्च भव्यं ’ या ऋचेत, संपूर्ण विश्वात जे काही होऊन गेले, आता आहे, व पुढे व्हावयाचे आहे, त्या सर्वोचे नाव ’ पुरुष ’ होय असे सांगितले आहे. अर्थात विश्व हेच पुरुष होय असे रुपक प्रथमत: कल्पिण्यात आले. पुढे क्रमाक्रमाने त्या रुपकाचा संकोच होत जाऊन अखेर मनुष्यजातीपैकी नुसत्या आर्यमंडळास ’ पुरुष ’ ही संज्ञा लागू लागली.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP