मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|उपमालंकार| लक्षण ३७ उपमालंकार लक्षण १ लक्षण २ लक्षण ३ लक्षण ४ लक्षण ५ लक्षण ६ लक्षण ७ लक्षण ८ लक्षण ९ लक्षण १० लक्षण ११ लक्षण १२ लक्षण १३ लक्षण १४ लक्षण १५ लक्षण १६ लक्षण १७ लक्षण १८ लक्षण १९ लक्षण २० लक्षण २१ लक्षण २२ लक्षण २३ लक्षण २४ लक्षण २५ लक्षण २६ लक्षण २७ लक्षण २८ लक्षण २९ लक्षण ३० लक्षण ३१ लक्षण ३२ लक्षण ३३ लक्षण ३४ लक्षण ३५ लक्षण ३६ लक्षण ३७ लक्षण ३८ लक्षण ३९ लक्षण ४० लक्षण ४१ उपमालंकार - लक्षण ३७ रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे. Tags : grammerrasagangadharमराठीरसगंगाधरव्याकरण लक्षण ३७ Translation - भाषांतर आतां, वर जें इव, वा इत्यादि सादृश्यवाचक शब्द सांगितले, त्यांच्या बाबतींत वैयाकरणांचे मत असें:-उपसर्गांना द्योतक मानणें आवश्यकच आहे; कारण त्यांना द्योतक न मानलें तर ‘ उपास्यते गुरु: ’ ( गुरूची उपासना केली जाते. ) ‘ अनु-भूयते सुखं ’ ( मुख अनुभविलें जातें. ) इत्यादि वाक्यांमध्यें, गुरु, सुख वगैरेंचा कर्म म्हणून, कर्मणि क्तियापदांच्या यत् ( य ) प्रत्ययानें उल्लेख होणार नाहीं; कारण कीं, वरील वाक्यांतील गुरु व सुख या दोन कारकांचें उपास्यते व अनुभूयते यांतील लट् लकारांनीं कर्म म्हणून अभिधान होणार नाहीं; कारण तीं धात्वर्थाचीं कर्मेंच असणार नाहींत ( तीं आतां उपसर्गांचीं कर्में होणार० ) ( पण अशा रीतीनें उपसर्गांना द्योतक मानणें भाग असलें तरी, ) इवादिकांना वाचकच मानावें; तसें न मानायला कारण होणारें एकही बाधकप्रमाण ( अनुपपत्ति वगैरे ) नाहीं; आणि ‘ इवादिकांना उप-सर्गाप्रमाणेंच द्योतक मानावें; ( कारण दोन्हींही निपात आहेत ) हा जो पूर्वीं त्यांना द्योतक मानायला ( निपातत्व हा जो ) हेतु दिला होता, तो, निष्फळ आहे, ( तो हेतु होऊच शकत नाहीं ) कारण निपात म्हणून इवादींना जर द्योतक म्हणत असाल तर, तमाम अव्ययांना द्योतक म्हणायची पाळी येईल. ”आतां, ह्या उपमेंतील चमत्काराचा अपकर्ष करणारे जे जे प्रकार असतील त्या सर्वांना दोष म्हणावें. त्यापैकीं उपमादोष म्हणून कांहीं पुढें सांगितले आहेत. ) (१) कविसमयप्रसिद्धि नसणें (२) उपमान व उप-मेय ह्या दोहोंचें जातीच्या बाबतींत आनुरूप्य नसणें. (३) प्रमाणाच्या बाबतींत आनुरूप्य नसणें. (४) लिंगाच्या बाबतींत आनुरूप्य नसणें (५) संख्येच्या बाबतींत आनुरूप्य नसणें. (६) बिंबप्रतिबिंबभावावर आधारलेल्या उपमेंत उपमान व उपमेय ह्यांच्यामधील परस्परांच्य़ा धर्मांत कमीपणा असणें. (७) अथवा अधिकपणा असणें. (८) अनुगामी धर्म असलेल्या उपमेंत साधारण धर्माचें कालाचे बाबतींत न जुळणें. (९) किंवा पुरुषाचे बाबतींत न जुळणें (१०) किंवा विध्यर्थांचे बाबतींत न जुळणें ( इत्यादि उपमेचे दोष समजावें. )आतां वरील सर्व उपमादोषांचीं, क्तमानें उदाहरणें हीं:-“ हे सुंदरी, तुझी मुखशोभा प्रफुल्ल कल्हाराप्रमाणें आहे, तुझ्या अधरोष्ठाचा रंग केशराप्रमाणें रम्य आहे, आणि तुझी अत्यंत शुद्धवाणी कापरांच्या वडयांच्या चवडीसारखी वाटते ” ( येथें कविसंकेताप्रसिद्धि-दोष आहे. )“ हा ऋषि पृथ्वीवर भटकत असतां कुत्र्यासारखा भासतो. ” ( हा जाति-आनुरूप्याभावरूप दोष )“ हा कुत्रा, ह्याला कांहीं एक करण्यासारखें उरलें नसल्यामुळें लोकांत महात्मा शुकदेवाप्रमाणें दिसतो. ” ( हाही जातीच्या आनुरूप्याच्या अभावाचा दोष )“ सरोवरामध्यें अगदीं पिकलेलें हें लिंबू, तरंगत असतां, सृष्टीच्या उत्पत्तीचें मूलकारण असलेला जो जलौघ त्यावर तरंगत असलेल्या ब्रह्मांड-मंडलाप्रमाणें शोभत आहे. ” ( येथें प्रमाणाचें आनुरूप्य नसणें हा दोष. ) N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP