मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|उपमालंकार| लक्षण २६ उपमालंकार लक्षण १ लक्षण २ लक्षण ३ लक्षण ४ लक्षण ५ लक्षण ६ लक्षण ७ लक्षण ८ लक्षण ९ लक्षण १० लक्षण ११ लक्षण १२ लक्षण १३ लक्षण १४ लक्षण १५ लक्षण १६ लक्षण १७ लक्षण १८ लक्षण १९ लक्षण २० लक्षण २१ लक्षण २२ लक्षण २३ लक्षण २४ लक्षण २५ लक्षण २६ लक्षण २७ लक्षण २८ लक्षण २९ लक्षण ३० लक्षण ३१ लक्षण ३२ लक्षण ३३ लक्षण ३४ लक्षण ३५ लक्षण ३६ लक्षण ३७ लक्षण ३८ लक्षण ३९ लक्षण ४० लक्षण ४१ उपमालंकार - लक्षण २६ रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे. Tags : grammerrasagangadharमराठीरसगंगाधरव्याकरण लक्षण २६ Translation - भाषांतर ह्यापैकीं पहिल्या उदाहरणांत आल्हादिनी व आनंदिनी हे अनुगामी धर्म असून ते ( धर्म ) उपमेय व उपमान ह्यांच्याठिकाणीं भिन्न स्थळीं भिन्न काळीं आहेत. दुसर्या उदाहरणांतील साधारण धर्म, बिंबप्रतिबिंबभावापन्न असून उपमेव व उपमान ह्यांच्या ठिकाणीं एकच काळीं व एकच स्थळीं राहतात, ह्या या दोहोंत फरक.आणि दुसर्या उदाहरणांत, सीता बाहेर आल्यावर पूर्वीपेक्षां जास्त कांतियुक्त दिसली, ह्या वाक्यार्थाला उपस्कारक, श्लोकांतील दोन्ही उपमा, आहेत; ह्यांपैकीं पहिल्या उपमेंतील सूर्यमंडलाचे लंकेशीं सादृश्य अशामुळे कीं, सूर्यमंडल स्वतांत शिरणार्या वस्तूचा पूर्ण नाश करून टाकणारें, व अत्यंत देहीष्यमान, आणि लंका पण आंत शिरलेल्या माणसाचा पूर्ण नाश करणारी, व सोन्याची असल्यानें अत्यंत तळणारी; आणि दुसर्या उपमेंतील अग्नीच्या राशीचें व लंकेचें सादृश्य अशामुळें कीं अग्नीची रास, सोन्याच्या शुद्धतेला दाखविते, व आंत पडलेल्या वस्तूला भस्म करून टाकते; आणि लंका ही सीतेच्या शुद्धतेची खात्री करून देण्यास कारणीभूत होणारी व तिला भस्म करूं पाहणारी; अशारीतीनें सूर्यमंडल व लंका ह्या जोडींत, व अग्नीची रास व लंका ह्या जोडींत, सादृश्य असल्यानें, लंका ही बिंबभूत आणि सूर्यमंडल व अग्नि राशी ही लंकेची प्रतिबिंबिंभूत समाजावी. येथील उपमा मालारूप आहे. कारण येथील सीता हे उपमेय एकच व त्या एकच उपमेयाला घेऊन अनेक उपमा श्लोकांत एकत्र आल्या आहेत.समस्तवस्तुविषया सावयवा उपमा ही:-“ जिचें तोंड कमळासारखें आहे; जिचे केस भुंग्याप्रमाणें आहेत; जिचे हात कमलाच्या तंतूप्रममाणें आहेत; व जिची ( पोटावरील ) केसांची ओळ ( म्ह० रोमराजि ) शेवाळ्याप्रमाणें आहे; अशी ती बाला एक अद्भुत सरोवराप्रमाणें आहे ” किंवा वरील उपमेचेंच हें दुसरें उदाहरण-“ चांदण्याप्रमाणें जिचें हसणें मंजुळ आहे; पूर्णचंद्राप्रमाणें जिच्या तोंडाची शोभा मनोहर आहे; पौर्णिमेच्या रात्रीप्रमाणें जिचें रूप रमणीय आहे, अशी ती सीता अत्यंत शोभते. ”ह्या दोन्ही उदाहरणांतील उपमा समस्तवस्तुविषया आहेत. कारण, ह्यांतील सर्व उपमानें शब्दाने सांगितलीं आहेत व ती सावयवा ( साड्रा ) ही आहे; कारण ह्यांतील मुख्य उपमा, तिच्या अंगभूत असलेल्या ( छोटया ) उपमांनीं बनविली आहे.एकदेशविवर्तिनी सावयवा. उपमा ही -“ मगरासारख्या मोठ्या योद्धयांनीं व रत्नासारख्या कवींनीं युक्त असा तूं हे राजा, अमृताप्रमाणें असणार्या कवितेचें, व चंद्राप्रमाणें असणार्या कीर्तीचें ह्या जगांत जन्मस्थान आहेस. ” N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP