मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा| उपदेश संत चोखामेळा अभंग संग्रह १ अभंग संग्रह २ संतांच्या स्मृतीत चोखामेळा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४१ आत्मनिवेदन बाल क्रीडा परिपूर्णता समाधान करुणा करुणा करुणा करुणा करुणा करुणा नाम नाम संत उपदेश उपदेश उपदेश उपदेश भाव विटाळ समाजाचे वर्ण नामदेव स्तुती संकीर्ण जोहार प्रसाद संत चोखामेळा परिचय संत चोखामेळा - उपदेश श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्पृश्य होते. Tags : abhangchokhamelaअभंगचोखामेळा उपदेश Translation - भाषांतर १५०) चंदनाचे संगे बोरीया बाभळी । हेकळी टाकळी चंदनाची ॥१॥संतांचिया संगें अभाविक जन । तयाच्या दर्शनें तेची होती ॥२॥चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा । नाहीं तरी भार वाहवा खरा ऐसा ॥३॥१५१) जन्मला देह पोशिला सुखाचा । काय भरंवसा याचा आहे ॥१॥येकलेंचि यावें येकलेंचि जावें । हेंचि अनुभवावें आपणाची ॥२॥कोण हे आघवे सुखाचे संगती । अंतकाळी होती पाठीमोरे ॥३॥चोखा म्हणे याचा न धरीं भरंवसा । शरणजा सर्वेशा विठोबासी ॥४॥१५२) जन्मांचे साकडें नाहीं माझे कोडें । जेंणें तुम्हां पडे वोझें देवा ॥१॥कोणत्याही कुळीं उंच नीच वर्ण । हे मज कारण नाहीं त्याचें ॥२॥कोण हे आघवे सुखाचे संगती । अंतकाळी होती पाठीमोरे ॥३॥चोखा म्हणे याचा न धरीं भरंवसा । शरण जा सर्वेशा विठोबासी ॥४॥१५३) जन्मांचे साकडें नाहीं माझे कोडें । जेंणें तुम्हां पडे वोझें देवा ॥१॥कोणत्याही कुळीं उंच नीच वर्ण । हे मज कारण नाहीं त्याचें ॥२॥वैष्णवाचे घरीं लोळेन परवरी । करीं कधिकारी उच्छिष्टाचा ॥३॥चोखा म्हणे जया घडे पंढरीची वारी । तयाचिये घरी पशुयाती ॥४॥१५४) जया जे वासना तया ती भावना । होतसे जाणा आदि अंतीं ॥१॥कामाचे विलग आवरावें चित्त । क्रोधाचा तो ऊत शांतवोनी ॥२॥ममताही माया दंभ अहंकार । आवरावे साचार शांति सुखें ॥३॥चोखा म्हणे याचा न धरावा संग । तरीच पांडुरंग हाता लागे ॥४॥१५५) डोळियाचा देंखणा पाहतांच दिठी । डोळाच निघाला देखण्या पोटी ॥१॥डोळ्याचा देखणा पाहिला डोळा । आपेआप तेथें झांकला डोळा ॥२॥चोखा म्हणे नवलाव झाला । देखणा पाहतां डोळा विराला ॥३॥१५६) तुटला आयुष्याचा दोरा । येर वाउगा पसारा ॥१॥ताकोनी पळती रांडा पोरें । अंती होती पाठमोरे ॥२॥अवघे सुखाचे सांगती । कोणी कामा नये अंती ॥३॥चोखा म्हणे फजितखोर । माझें माझें म्हणे घर ॥४॥१५७) तुम्ही तों सांकडें बहुत वारिलें । आतां कां उगलें बोलूं देवा ॥१॥आजीवरी पडिलों लिगाडाचे गुंतीं । तेणेंचि फजिती झाली दिसे ॥२॥झाला दिसे मज मोकळा मारग । धिक्कारिती जग मागें पुढें ॥३॥चोखा म्हणे ऐसें विपरीत देखिलें । तें साचचि संचलें मनीं माझ्या ॥४॥१५८) देव म्हणे नारदासी । जाय निर्मळा तीर्थासी ॥१॥तीर्थ निर्मळे संगमी । स्नान करी नारदस्वामी ॥२॥नारदाची नारदी सरी । धन्य धन्य मेहुणपुरी ॥३॥चोखा म्हणे हेंचि देई । स्नान घडो तये ठायीं ॥४॥१५९) देह बुद्धीवेगळें जें आकारलें । निर्गुण तें सगुणपणें उभें केलें ॥१॥देव पहा तुम्हीं देव पहा । तुम्हीं देव पहा तुम्हीं आपुले देहीं ॥२॥उघडाचि देवो जगीं प्रकाशला । नागव्याक्तानें देव ग्रासीला ॥३॥चोखा म्हणे नागवे उघडे झाले एक । सहज मीपण देख मावळले ॥४॥ N/A References : N/A Last Updated : July 10, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP