मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा| करुणा संत चोखामेळा अभंग संग्रह १ अभंग संग्रह २ संतांच्या स्मृतीत चोखामेळा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४१ आत्मनिवेदन बाल क्रीडा परिपूर्णता समाधान करुणा करुणा करुणा करुणा करुणा करुणा नाम नाम संत उपदेश उपदेश उपदेश उपदेश भाव विटाळ समाजाचे वर्ण नामदेव स्तुती संकीर्ण जोहार प्रसाद संत चोखामेळा परिचय संत चोखामेळा - करुणा श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्पृश्य होते. Tags : abhangchokhamelaअभंगचोखामेळा करुणा Translation - भाषांतर ९६) मजचि कां करणें लागला विचार । परी वर्म साचार न कळे कांही ॥१॥कैशी करुं सेवा आणिक ते भक्ति । न कळे विरक्ति मज कांही ॥२॥आणिक तो दुजा नाहीं अधिकार । कैसा हा विचार करूं आतां ॥३॥चोखा म्हणे बहु होती आठवण । कठिण कठिण पुढें दिसे ॥४॥९७) माझा मी विचार केला असे मना । चाळवण नारायणा पुरें तुमचें ॥१॥तुम्हांवरी भार घातिलेंसें वोझें । हेंचि मी माझें जाणतसें ॥२॥वाउगें बोलावें दिसे फलकट । नाहीं बळकट वर्म आंगीं ॥३॥चोखा म्हणे सुखें बैसेन धरणा । तुमच्या थोरपणा येईल लाज ॥४॥९८) माझा तंव अवघा खुंटला उपाय । रिता दिसे ठाव मजलागीं ॥१॥करितोचि दिसे अवघेचि वाव । सुख दु:ख ठाव अधिकाधिक ॥२॥लिगाडाची माशी तैसी झाली परी । जाये तळीवरी सुटका नव्हे ॥३॥चोखा म्हणे अहो दीनांच्या दयाळा । पाळा कळवळा माझा देवा ॥४॥९९) माया मोहोजाळे गुंतलोंसे बळें । यांतोनी वेगळें करीं गा देवा ॥१॥न कळेचि स्वार्थ अथवा परमार्थ । बुडालोंसे निभ्रांत याचमाजी ॥२॥न घडे देवार्चन संतांचें पूजन । मन समाधान कधीं नव्हे ॥३॥नसतेचि छंद लागती अंगासी । तेणें कासावीस जीव होय ॥४॥चोखा म्हणे याही चोरें नागविलों । माझा मीचि झालो शत्रु देवा ॥५॥१००) मी तो विकलों तुमचिये पायीं । जीवभाव सर्वहि अर्पियेला ॥१॥माझा मीच झालों उतराई देवा । तुमचें तुम्हीं पाहा आम्हांकडे ॥२॥नव मास माता वोझें वाहे उदरीं । तैसीच ही परी तुमची माझी ॥३॥अपत्य आपुलें फिरे देशोदेशीं । ही लाज कोणासी चोखा म्हणे ॥४॥१०१) यातीहीन मज म्हणती देवा । न कळे करूं तुमची सेवा ॥१॥आम्हां नीचांचे तें काम । वाचें गावें सदां नाम ॥२॥उच्छिष्टाची आस । संत दासाचा मी दास ॥३॥चोखा म्हणे नारायण । पदरीं घेतलें मज दीना ॥४॥१०२) वारंवार किती करूं करकर । माझा तंव आधार खुंटलासे ॥१॥न बोलावें आतां हेंचि शहाणपण । होउनी पाषाण पडो द्वारीं ॥२॥केव्हां तरी तुम्हां होईल आठवणे । हाचि एक भाव धरूं आतां ॥३॥चोखा म्हणे मग येशील गिवसित । तोंवरी चित्त दृढ करूं ॥४॥१०३) श्वान अथवा सुकर होका मार्जार । परी वैष्णवाचें घर देईं देवा ॥१॥तेणें समाधान होय माझ्या जीवा । न भाकीं कींव आणिकासी ॥२॥उच्छिष्ट प्रसाद सेवीन धणिवरी । लोळेन परवरी कवतुकाने ॥३॥चोखा म्हणे कोणी जातां पंढरीसी । दंडवत त्यासी घालीन सुखें ॥४॥१०४) समर्थांसी रंकें शिकवण जैशी । माझी वाणी तैशी बडबड ॥१॥शुभ हें अशुभ न कळे बोलतां । परि करीं सत्ता लंडपणें ॥२॥उच्छिष्टाची आशा भुंकतसे श्वान । तैसा मी एक दिन आहें तुमचा ॥३॥चोखा म्हणे एका घासाची चाकरी । करितों मी द्वारीं तुमचीया ॥४॥१०५) साच जें होतें तें दिसोनियां आलें । आतां मी न बोले तुम्हां कांहीं ॥१॥तुमचें उचित तुम्हींच करावें । आम्हीं सुखें पाहावें होय तैसें ॥२॥विपरीत सुपरीत तुमचीय़े घरीं । तुमची तुम्हां थोरी बरी दिसे ॥३॥चोखा म्हणे ऐसा हा नवलाव । न कळेचि भाव ब्रम्हादिका ॥४॥१०६) सुखाचिया लागीं करितों । तो अवघेंचि वाव येतें ॥१॥करितां तळमळ मन हें राहिना । अनावर जाणा वासना हे ॥२॥अवघेचि सांकडें दिसोनियां आलें । न बोलावें तें भलें कोणा पुढें ॥३॥चोखा म्हणे मी पडिलों गुर्हाडीं । सोडवी तातडी यांतूनीयां ॥४॥१०७) संसाराचें नाहीं भय । आम्हां करील तो काय । रात्रंदिवस पाय । झालों निर्भय आठवितां ॥१॥आमुचें हें निजधन । जोडियेले तुमचे चरण । आणि संतांचें पूजन । हेंचि साधन सर्वथा ॥२॥कामक्रोधादिक वैरी । त्यांसी दवडावे बाहेरी । आशा तृष्णा वासना थोरी । पिडिती हरी सर्वदा ॥३॥आतां सोडवी या सांगासी । न करीं पांगिला आणिकांसी । चोखा म्हणे ह्रषिकेशी । अहर्निशीं मज द्यावें ॥४॥१०८) हीन याती माझी देवा । कैसी घडे तुझी सेवा ॥१॥मज दूर दूर हो म्हणती । तुज भेटूं कवण्या रीती ॥२॥माझा लागतांचि कर । सिंतोडा घेताती करार ॥३॥माझ्या गोविंदा गोपाळा । करूणा भाकी चोखामेळा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : July 10, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP