मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा| संत संत चोखामेळा अभंग संग्रह १ अभंग संग्रह २ संतांच्या स्मृतीत चोखामेळा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४१ आत्मनिवेदन बाल क्रीडा परिपूर्णता समाधान करुणा करुणा करुणा करुणा करुणा करुणा नाम नाम संत उपदेश उपदेश उपदेश उपदेश भाव विटाळ समाजाचे वर्ण नामदेव स्तुती संकीर्ण जोहार प्रसाद संत चोखामेळा परिचय संत चोखामेळा - संत श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्पृश्य होते. Tags : abhangchokhamelaअभंगचोखामेळा संत Translation - भाषांतर १३४) आजि दिवस धन्य सोनियाचा । जीवलग विठोबाचा भेटलासे ॥१॥तेणें सुख समाधान झाली विश्रांती । दुजे नाठवती चित्तीं कांही ॥२॥समाधानें जीव राहिला निश्चळ । गेले हळह्ळ त्रिविध ताप ॥३॥१३५) कोणी पंढरीसी जाती वारकरी । तयांचे पायांवरी भाळ माझें ॥१॥आनंदें तयांसी भेटेन आवडी । अंतरीची गोडी घेईन सुख ॥२॥ते माझें मायबाप सोयरे सज्जन । तयां तनु मन वोवाळीन ॥३॥चोखा म्हणे ते माहेर निजाचें । जन्मोजन्मांतरिचे साहाकारी ॥४॥१३६) माझा शिण भाग अवघा हरपला । विठोबा देखिला विटेवरी ॥१॥अवघ्या जन्मांचें सार्थक पैं झालें । समचरण देखिलें डोळेभरी ॥२॥चंद्रभागे तीरीं नाचती वारकरी । विठ्ठलनाम गजरीं आनंदानें ॥३॥दिंडया गरुड टके पताकांचे भार । होतो जयजयकार नामघोष ॥४॥तो सुखसोहळा देवांसी दुर्लभ । आम्हां तो सुलभ चोखा म्हणे ॥५॥१३७) माझ्या मना तूं धरी कां विचार । न करी प्रकार आन कांहीं ॥१॥पंढरीसी कोणी जाती वारकरी । सुखें त्यांचे घरी पशुयाती ॥२॥तयाचिया सवें घडेल चिंतन । चंद्रभागे स्नान एकादशी ॥३॥जागर क्षिरापती वैष्णव सांगाते । घडेल आपैतें लाभ मज ॥४॥चोखा म्हणे घडेल संतांची संगती । सहज पंगती बैसेन मी ॥५॥१३८) वेध कैसा लागला वो जीवा । नाठवेचि हेवा दुजा कांहीं ॥१॥पंढरीचे वाटे येती वारकरी । सुखाची मी करीं मात तयां ॥२॥माझ्या विठोबाचें गाती जे नाम । ते माझे सुखधाम वारकरी ॥३॥लोटांगणें सामोरा जाईन तयांसी । क्षेम आनंदेसी देईन त्यांसी ॥४॥चोखा म्हणे माझा प्राणाचा तो प्राण । जाईन वोवाळोन जीवें भावें ॥५॥१३९) सप्रेम निवृत्ति आणि ज्ञानदेव । मुक्ताईचा भाव विठ्ठल चरणीं ॥१॥सोपान सांवता गोरा तो कुंभार । नरहरी सोनार प्रेम भरित ॥२॥कबीर कमाल रोहिदास चांभार । आणिक अपार वैष्णव जन ॥३॥चोखा तया पायीं घाली लोटांगण । वंदितो चरण प्रेमभावें ॥४॥ N/A References : N/A Last Updated : July 10, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP