मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा| करुणा संत चोखामेळा अभंग संग्रह १ अभंग संग्रह २ संतांच्या स्मृतीत चोखामेळा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४१ आत्मनिवेदन बाल क्रीडा परिपूर्णता समाधान करुणा करुणा करुणा करुणा करुणा करुणा नाम नाम संत उपदेश उपदेश उपदेश उपदेश भाव विटाळ समाजाचे वर्ण नामदेव स्तुती संकीर्ण जोहार प्रसाद संत चोखामेळा परिचय संत चोखामेळा - करुणा श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्पृश्य होते. Tags : abhangchokhamelaअभंगचोखामेळा करुणा Translation - भाषांतर ७६) जनक तूं माझा जननी जगाची । करूणा आमुची कां हो नये ॥१॥कासया संसार लावियेला पाठीं । पडलीसे तुटी तुमची माझी ॥२॥जन्म जरा मरण आम्हां सुख दु:ख । पाहासी कौतुक काय देवा ॥३॥गहिंवरूनी चोखा उभा महाद्वारीं । विनवी जोडूनि करीं विठोबासी ॥४॥७७) जन्मांची वेरझारी । तुम्हांविण कोण वारी । जाचलों संसारी । सोडवण करी देवराया ॥१॥शरण शरण पंढरीराया । तुम्हां आलों यादवराया । निवारोनियां भया । मज तारा या सागरीं ॥२॥तुम्हांविण माझें कोडें । कोण निवारी सांकडें । मी तों झालों असे वेडे । उपाय पुढें सुचेना ॥३॥चोखा म्हणे दीनानाथा । आतां निवारीं हे भवव्यथा । म्हणोनी ठेवितसें माथा । चरणांवरी विठूच्या ॥४॥७८) जयांचियासाठीं जातो वनाप्रती । ते तों सांगाती येती बळें ॥१॥जयांचियासाठीं टाकिला संसार । ते तों बलवत्तर पाठीं येती ॥२॥जयाचिया भेणें घेतिलें कपाट । तो तेणें वाट निरोधिली ॥३॥जयाचिया भेणें त्यागियेलें जग । तो तेणें उद्योग लावियेला ॥४॥चोखा म्हणे नको होऊं परदेशी । चिंतीं विठोबासी ह्रदयामाजी ॥५॥७९) जिकडे पाहे तिकडे बांधलोंसे हरी । सुटायाचा करी बहु यत्न ॥१॥परी तें वर्म मज न कळे कांहीं । अधिंकचि डोहीं बुडतसे ॥२॥एका पुढें एक पडती आघात । सारितां न सरत काय करूं ॥३॥चोखा म्हणे येथें न चलेंचि कांही । धांवे माझे आई विठाबाई ॥४॥८०) तुमच्या चरणी जें कांही आहे । तें सुख पाहे मज द्यावें ॥१॥सर्वांसी विश्रांति तेथें मन ठेवीं । तें सुख शांति देई मज देवा ॥२॥सर्वांभूती दया संतांची ते सेवा । हेंचि देई देवा दुजें नको ॥३॥चोखा म्हणे आणिक दुजें नको कांहीं । जीव तुझे पायीं देईन बळी ॥४॥८१) तुम्हांसी शरण बहुत मागं आले । तयांचे साहिले अपराध ॥१॥तैसा मी पामर यातिहीन देवा । माझा तो कुढावा करा तुम्ही ॥२॥नाहीं अधिकार उच्छिष्टा वेगळा । म्हणवोनी कळवळा पाळा माझा ॥३॥चोखा म्हणे मज कांहीं तें न कळे । नामाचिया बळें काळ कंठी ॥४॥८२) तुम्हीं वाढविलें तुम्हीं पोसियेलें । तुम्हींच दाविलें जग मज ॥१॥तुमचा प्रकार तुमचा तुम्ही जाणा । आमुचिया खुणा जाणों आम्हीं ॥२॥तुम्हांसी तों भीड कासयाची देवा । हेचि केशवा सांगा मज ॥३॥चोखा म्हणे काय बोलूं येयावरी । माझा तूं कैवारी देवराया ॥४॥८३) देवा कां हें साकडें घातिलें । निवारा हें कोडें माझें तुम्ही ॥१॥समर्थे आपुल्या नामासी पाहावें । मनीं उमजावें आपुलिया ॥२॥यातिहीन आम्हां कोण अधिकार । अवघे दूरदूर करिताती ॥३॥चोखा म्हणे ऐसा हीन नरदेह । पडिला संदेह काय करूं ॥४॥८४) धरोनिया आशा टाकिलासे ठाव । अवघाचि वाव झाला दिसे ॥१॥कवणासी सांकडें सांगूं पंढरीराया । कांहो न ये दया माझी तुम्हां ॥२॥बाळकाचे परी लडिवाळपणें । तुमचें पोसणें मी तों देवा ॥३॥चोखा म्हणे मज तुम्ही मोकलितां । काय आमुची कथा आतां चाले ॥४॥८५) धरोनी विश्वास राहिलेसें द्वारीं । नाम श्रीहरी आठवीत ॥१॥कळेल तैसें करा जी दातारा । तारा अथवा मारा पांडुरंगा ॥२॥मी तंव धरणें घेवोनी बैसलों । आतां बोलों येयापरी ॥३॥चोखा म्हणे माझा हाचि नेम आतां । तुम्ही कृपावंत सिद्धि न्यावा ॥४॥ N/A References : N/A Last Updated : July 10, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP