मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा| अभंग २१ ते ३० संत चोखामेळा अभंग संग्रह १ अभंग संग्रह २ संतांच्या स्मृतीत चोखामेळा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४१ आत्मनिवेदन बाल क्रीडा परिपूर्णता समाधान करुणा करुणा करुणा करुणा करुणा करुणा नाम नाम संत उपदेश उपदेश उपदेश उपदेश भाव विटाळ समाजाचे वर्ण नामदेव स्तुती संकीर्ण जोहार प्रसाद संत चोखामेळा परिचय संत चोखामेळा - अभंग २१ ते ३० श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्पृश्य होते. Tags : abhangchokhamelaअभंगचोखामेळा विठ्ठल Translation - भाषांतर २१) मज तो नवल वाटतसे जीवी । आपुली पदवी विसरले ॥१॥कवणिया सुखा परब्रम्हा भुललें । गुंतोनी राहिलें भक्तभाके ॥२॥निर्गुण होतें तें सगुण पैं झालें । विसरोनी गेलें आपआपणा ॥३॥चोखा म्हणे ऐसा भक्तांचा कृपाळ । दीनांचा दय़ाळ पंढरीये ॥४॥२२) मुळींचा संचला आला गेला कोठें । पुंडलीक पेठे विटेवरी ॥१॥विठोबा देखणा विठोबा देखणा । योगियांचा राणा पंढरिये ॥२॥भाविका कारणें उभारोनि हात । वाट जो पहात अनुदिनी ॥३॥चोखा म्हणे ऐसा भक्तांचा कृपाळ । दीनांचा दयाळ पंढरीये ॥४॥२३) विठोबा पाहुणा आला आमुचे घरा । निंबलोण करा जीवें भावें ॥१॥पंचप्राण ज्योती ओंवाळुनी आरती । ओंवाळीला पती रखुमाईचा ॥२॥षड्रस पव्कानानें विस्तारिलें ताट । जेवूं एकवट चोखा म्हणे ॥३॥२४) व्यापक व्यापला तिन्हीं त्रिभुवनीं । चारी वर्ण बाणी विठू माझा ॥१॥पंचप्राण ज्योती ओंवाळुनी आरती । ओंवाळीला पती रखुमाईचा ॥२॥षड्ररस पव्कानानें विस्तारिलें ताट । जेवूं एकवट चोखा म्हणे ॥३॥२५) सकळा आगराचें जें मूळ । तो हा सोज्वळ विठू माझा ॥१॥वेदांचा विचार शास्त्रांची जे गती । तोचि हा श्रीपती विठु माझा ॥२॥कैवल्य देखणा सिद्धांचा जो राणा । भाविकासी खुणा विठू माझा ॥३॥चोखा म्हणे माझ्या ह्रदयीं बिंबला । त्रिभुवनीं प्रकाशला विठू माझा ॥४॥२६) सर्वही सुखाचें वोतिलें श्रीमुख । त्रिभुवन नायक पंढरीये ॥१॥कर दोन्हीं कटीं सम पाय विटे । शोभले गोमतें बाळरूप ॥२॥जीवाचें जीवन योगियांचे धन । चोखा म्हणे मंडन तिन्ही लोकीं ॥३॥२७) सुंदर मुखकमल कस्तुरी मळवटीं । उभा देखिला तटीं भीवरेच्या ॥१॥मकराकार कुंडलें श्रवणीं ढाळ । देती गळां वैजयंती मुक्तमाळा ॥२॥शंख चक्र गदा पद्म चहूं करीं । गरूडवाहन हरी देखियला ॥३॥चोखा म्हणे सर्वं सुखाचें आगर । निरा भिवरा तीर विठ्ठल उभा ॥४॥२८) श्रवणाचें श्रवण घ्राणाचें जें घ्राण । रसने गोडपण विठ्ठल माझा ॥१॥वाचा जेणें उठी डोळा जेणें भेटी । इंद्रियाची राहाटी विठ्ठल माझा ॥२॥प्राण जेणें चळे मन तेणें वोळे । शून्यातें वेगळें विठ्ठल माझा ॥३॥आनंदी आनंद बोधा जेणें बोध । सकळां आत्मा शुद्ध विठ्ठल माझा ॥४॥मुळाचें निजमूळ अकुळाचें कूळ । चोखा म्हणे निजफळ विठ्ठल माझा ॥५॥२९) श्रीमुख चांगले कांसे पितांबर । वैजयंती हार रूळे कंठी ॥१॥तो माझ्या जीवीचा जिवलग सांवळा । भेटवा हो डोळां संतजन ॥२॥बहुतांचें धावणें केलें नानापरी । पुराणें ही थोरी वानिताती ॥३॥चोखा म्हणे वेदशास्त्रांसी जो साक्षी । तोचि आम्हा रक्षी नानापरी ॥४॥३०) श्रीमुखाची शोभा कस्तुरी मळवट । उभा असे नीट विटेवरी ॥१॥कर दोनीं कटीं कुंडल झळकती । तेज हे फांकती दशदिशा ॥२॥वैजयंती माळा चंदनाची उटी । टिळक लल्लाटीं कस्तुरीचा ॥३॥चोखा म्हणे माझ्या जीवींचा जीवनु । पाहतां तनु मनु भुलोनी जाय ॥४॥ N/A References : N/A Last Updated : July 10, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP