मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा| अभंग १ ते १० संत चोखामेळा अभंग संग्रह १ अभंग संग्रह २ संतांच्या स्मृतीत चोखामेळा अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४१ आत्मनिवेदन बाल क्रीडा परिपूर्णता समाधान करुणा करुणा करुणा करुणा करुणा करुणा नाम नाम संत उपदेश उपदेश उपदेश उपदेश भाव विटाळ समाजाचे वर्ण नामदेव स्तुती संकीर्ण जोहार प्रसाद संत चोखामेळा परिचय संत चोखामेळा - अभंग १ ते १० श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्पृश्य होते. Tags : abhangchokhamelaअभंगचोखामेळा विठ्ठल Translation - भाषांतर १) अनादि निर्मळ वेदांचें जें मूळ । परब्रम्हा सोज्वळ विटेवरी ॥१॥कर दोन्ही कटी राहिलासे उभा । नीळवर्णप्रभा फांकतसें ॥२॥आनंदाचा कंद पाऊलें साजिरी । चोखा म्हणे हरी पंढरीये ॥३॥२) अनाम जयासी तेचं रूपा आलें । उभें तें राहिलें विटेवरी ॥१॥पुंडलिकाच्या प्रेमा युगे अठ्ठावीस । समचरणी वास पंढरीये ॥२॥चोखा म्हणे ऐसा भक्तांचा कनवाळू । जाणे लळा पाळू भाविकांचा ॥३॥३) अवघा प्रेमाचा पुतळा । विठ्ठल पाहा उघडा डोळा ॥१॥जन्ममरणाची येरझारी । तुटे भवभय निर्धारी ॥२॥ऐसा प्रताप आगळा । गाये नाचे चोखामेळा ॥३॥४) अंगिकार करी तयाचा विसर । न पडे साचार तया लागीं ॥१॥तो हा महाराज चंद्रभागे तटी । उभा वाळुवंटी भक्तकाजा ॥२॥अनाथा कैवारी दीना लोभपर । वागवितो भार अनाथांचा ॥३॥चोखा म्हणे माझी दयाळू माउली । उभी ती राहिली विटेवरी ॥४॥५) आणिक दैवतें देतीं काय बापुडीं । काय याची जोडी इच्छा पुरे ॥१॥तैसा नव्हे माझा पंढरीचा राजा । न सांगता सहजा इच्छा पुरे ॥२॥न लगे आटणी तपाची दाटणी । न लगे तीर्थाटणी काया क्लेश ॥३॥चोखा म्हणे नाम जपतां सुलभ । रुक्मिणीवल्लभ जवळी वसे ॥४॥६) आपुलिया सुखा आपणचि आला । उगलाचि ठेला विटेवरी ॥१॥तें हें सगुण रूप चतुर्भुज मूर्ति । शंख चक्र हातीं गदा पद्म ॥२॥किरीट कुंडलें वैजयंती माळा । कांसे सोनसळा तेज फाके ॥३॥चोखा म्हणे सर्व सुखाचें आगर । रूप मनोहर गोजिरें तें ॥४॥७) उतरले सुख चंद्रभागे तटीं । पाहा वाळुवंटी बाळरूप ॥१॥बहुता काळाचें ठेवणें योगियाचें । ध्येय शंकराचे सुख ब्रम्हा ॥२॥जयालागीं अहोरात्र विवादती । तो भक्ताचिये प्रीतीं उभा असे ॥३॥चोखा म्हणे सर्व सुखांचे आगर । न कळे ज्याचा पार श्रुति-शास्त्रां ॥४॥८) करी सूत्र शोभे कटावरी । तोचि हा सोनार नरहरी ॥१॥पायीं वाजती रूणझुण घंटा । तोचि नामयाचा नागर विठा ॥२॥काम चरणींचा तोडरू । परिसा ऊठतसे डीगरू ॥३॥दक्षिण चरणीचा तोडरू । जयदेव पदाचा गजरू ॥४॥विठेवरी चरण कमळा । तो जाणा चोखामेळा ॥५॥९) गोजिरें श्रीमुख चांगलें । ध्यानीं मिरवले योगीयांच्या ॥१॥पंढरी भुवैकुंठ भिवरेच्या तीरीं । वैकुंठाचा हरी उभा विटे ॥२॥राई रखुमाई सत्यभामा नारी । पुंडलिकें सहपरिवारीं आणियेला ॥३॥वैजयंती माळ किरीट कुंडलें । प्रेमें आलिंगिलें चोखियानें ॥४॥१०) चोखट चांग चोखट चांग । एक माझा पांडुरंग ॥१॥सुख तयाचे चरणीं । अवघी सुकृतांची खाणी ॥२॥महापातकी नासले । चोखट नाम हें चांगले ॥३॥महाद्वारी चोखामेळा । विठ्ठल पाहातसे डोळां ॥४॥ N/A References : N/A Last Updated : July 10, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP