TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
श्री आर्या

श्री आर्या

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

श्री आर्या
अज नंदनात्मज श्री रामसदयह्रदय अति भला साचा । अभय वरद हस्त सदा अभिमानी पूर्ण आत्म दासांचा ॥१॥
भजन प्रेमसदारा किति माझ्या भक्तवत्सला रामा । भव भय हरूनि ह्रदयीं भजकांला दे अखंड आराम ॥२॥
यन्नामी भव गिरिजा रात्रदिवस गुंग यत्सुखीं रमती । यद्‌गुण गण लंपट सुर यत्तेजें वीर ते दमती ॥३॥
वधि रावणासि वीरा सुर कल्याणार्थ वन्द्य तोचि मला । वरिला सच्चित्सुखमय वरिष्ठ तत्स्वरूपि जीव हा रमला ॥४॥
रवि कुलभूषण अतो म - त्प्रियात्म सुखकारि रजनि दिवस बरा । रक्ष: कुल वधुनि सुरां रक्षण करि निज पराक्रमें जबरा ॥५॥
दरति अघें यन्नामा प्रिय मज तो फार दर्शनास हरी । दडति जया शत्रु ससुह दमउनि मन उठवि आत्मसुखा लहरी ॥६॥
ह्रर्षुनि यद्भक्त उरु स्तवन करिति उभय हस्त जोडुनि ज्यां । हत शत्रु विजयि तो प्रभु हरुनि दुरित कळवि चित्सुखास निजा ॥७॥
स्तव्या पदीं रमविमती निज भक्त ध्व - स्त भय कळायास । स्तवनप्रिय राम सम स्त जना नामेच अघजळायास ॥८॥
श्री मद्राजारामा मारुतिसह सर्वदा करीं वास । ह्रदयीं विष्णू कृष्ण जगन्नाथा स्वसुख गोड जीवास ॥९॥
॥ श्री आर्या ॥
नव नव नवल सुखास्पद नक्रांतक नम्र दास नम - न तया । नर सुरवर मन रमवी नश्वर न उरवुनि न ढळवी न तया ॥१॥
रख रख रगडि मनातिल रमउनि पदिं रजनिदिवस रस रसवी । रवि वंशज नुर वुनि तम तम रघुपति रजनीश रत्न मधुर सवी ॥२॥
हळ हळ हरिभक्तांची ह्रटकुनि करि हर्ष मन हटें हटवी । हरि नर देव अह र्निशिं हसवि हतरिपू हराद्यनी हकवी ॥३॥
रिपु रिपु रिपु ते षडरिपु रिघुनि जनी रिष्ट करिति रि रि रिपणें । रीति अशीच तरि नुरवि ध - री वृहरि ह रि न तारि पणे ॥४॥
प्रर्‍हाद वरद लक्ष्मी नरसिव्हा नरहरे रमारमणा । विष्णो कृष्ण जगन्नाथा लक्षुनि हरिं तमोमय भ्रमणा ॥५॥
वरच्या आर्त्यानीं १३ तेरा खेपा ‘नरहरी’ हा मंत्र आला आहे.
॥ श्री आर्या ॥
हर्षद हनुमान्‌ मारुत बलभी - म समर्थ रामदास मला ॥ हरुनि त्रिविध तापांतें हतराक्षस रामिं जो सदा रमला ॥१॥
नूतन नूतन रुचिकर लक्ष्य म - हा सुखद मेश मज दावी ॥ नूपुरु विभूषणान्वित नू नं मनरम्यता मतिस ठावी ॥२॥
मंगल मंगल तीव्र न भी हर रुक्‌ सौख्यकर मला नमबी । मंत्र जपें षडरिपु बल मंथी दाऊनि आत्मसुख रमवी ॥३॥
तरवि - त दु:ख समद्रा मच्चित्ता द्रउनि साथ करि राम ॥ तन्मयपणें कळे मज तद्रस पानेंचि संसृति विराम ॥४॥
रघुविर रामस्वामी त्यजुनि अहंकार मी तुला शरण ॥ चरण तुझे मज दावीं हरण करिति ते पुनर्जनन मरण ॥१॥
विष्णो कृष्ण जगन्नाथा श्रीरामा निजात्मुसुख देईं ॥ आर्या चार तुवां ज्या रचिल्या त्या तुज समर्पुनी घेईं ॥२॥
वरच्या आर्त्यांत ४ वेळा ‘हनूमंत’ हा मंत्र व एक वेळा ‘मारुति’ ‘बलभीम’ महारुद्र’ हे मंत्र आले आहेत.
॥ श्री आर्या ॥
श्री मद्रम रघुवर श्री सुखकर मन्मतीसि पदिं मुरवी ॥ श्रीश जगत्पति विजय श्रीनें षट्‌ शत्रु समुह तो नुरवी ॥१॥
सीमा न निजगुणाची सिद्ध शिरोमणि शिवासि रघुगया ॥ सीतापति निज नामचि सिद्धिप्रद विषय हेतु न उराया ॥२॥
तारक तूं अरिमारक तारापति बंधु सुखकरा रामा ॥ ताराधिपानना मज तारिं सदय सज्जनांतरा रामा ॥३॥
राक्षस लंकाधिप जो रावण त्या वधुनि तदनुजालंका ॥ रामा समर्पिली त्वां राजेंद्रा आत्म कीर्ति अकलंका ॥४॥
मननें स्वचरित्रांच्या मन्मन करिं शुद्ध कळविं निज नातें ॥ मळ नुरवुनि विस्मृति रुप मज लाविं अखंड आत्म भजान्तें ॥५॥
मानवसा दिससी परि माधव तूं आद्य सच्चिदानंद ॥ माता पिता निजजनां मारिसि अवतरुनि दुष्ट मतिमंद ॥६॥
रुष्ट न होसि प्रिय जनि रुचिर निजस्वरूप आवडे मातें ॥ रुद्र प्रिय नाम तुझें रुचिकर गातों धरूनि प्रेमातें ॥७॥
ती दे मनास भक्ती  तीव्र विषय वासना सरायास ॥ तीनी गुण जींत विरति तीर कळविं आत्मसुक वरायास ॥८॥
विष्णो कृष्ण जगन्नाथा श्रीरामा तुझ्या तुवां आर्या । रचिल्या समार्पिल्या तुज कारण तूं सर्व या जगत्कार्या ॥१॥
या आर्यानीं ‘श्री सीताराम मारुती’ हा मंत्र ४ वेळा आला आहे.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-12-16T20:54:10.4800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

microtomy

  • सूक्ष्मछेदन 
RANDOM WORD

Did you know?

गणपतीचे प्रकार किती व कोणते?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.