TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पदे ३२६ ते ३३०

श्री रामनाथाचीं पदें - पदे ३२६ ते ३३०

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

पदे ३२६ ते ३३०
पद ३२६ वें.
मज विषयीं करुणा कैसी तुज न ये रामनाथा, व्यर्थ गुंतुनि संसारिं गेलें वय अविचारीं ॥म०॥धृ०॥
काम दहन दिन यामिनि ह्लद्नत साक्षि स्वरूपा निश्चयें आवडसि दिनानाथा । परि विषय वासना भारीं जाचिति निवारिं ॥मज०॥१॥
या मनासि सुख धाम दाविं निज नाम स्मरणें सदया रक्षिलें त्वां अनाथा । आत्म भक्तांच्या कैवारी धांवसी नाना-अवतारीं ॥मज०॥२॥
वैष्णव सुखकर कृष्ण जगन्नाथ तुला शरण सदोदित अर्पिला चरणीं माथा । देह मी पण हें सारीं ब्रह्मांनंदीं निर्विकारीं ॥ मज विषयीं करुणा कैसी तुज न ये रामनाथा ॥३॥

पद ३२७ वें
श्री रमनाथ कां रे लविला देवा वेळ निजात्म भेटि द्याया ॥धृ०॥
साच सांगतों मी तुज जाच न साहति, मज वांचवि एकदा सर्व हरुनि अपाया ॥श्री०॥१॥
नावडे संसार मनिं त्रासलों दिन यामिनी, कामिनि धन चिंतुनि जाय जन्म वाया ॥श्री०॥२॥
वैष्णव सज्जन खुण साक्षि ह्लदयिं आपण, प्रभु नाशिवंत कृष्ण जगन्नाथ काया ॥श्री०॥३॥

पद ३२८ वें.
यामिनि प्रियकर नाम तुझें प्रभु रामनाथ भक्त काम कल्पतरु ॥धृ०॥
राम स्मरण सुख सेविसि आंगें प्रमुख, सुंदर सुहास्य मुख भेटि दे चंद्रशेखरु ॥या०॥१॥
गिरिजा रमणा मज दाउनि पदांबुज, कथिं निज हितगुज भवांबुधि हा उतरूं ॥या०॥२॥
वैष्णव आपण दयेचा सागर पूर्ण, कृष्ण जगन्नाथ खुण लागे निशिदिनि स्मरूं ॥या०॥३॥

पद ३२९ वें.
शरण तुला मी सदया स्वामि रामनाथा रे ॥धृ०॥
कळवुनि निजखुण पळवीं देहात्म बिज रे । दावि दिव्य पदांबुज देवा दिनानाथा रे ॥श०॥१॥
साक्षि मनाचा तूं प्रिय साचा रे । लाभ देउनि आत्म सुखाचा रक्षि मज अनाथा रे ॥श०॥२॥
वैष्णव सद्भक्ति नेटीं ध्यातोम आपणा धूर्जटि रे । दर्शनाची आस पोटीं कृष्ण जगन्नाथा रे ॥ शरण तुला मी सदया स्वामि रामनाथा रे ॥३॥

पद ३३० वें.
देव रामनाथ हास्य मुखी पाहिला नयनी देव । जिव हा सुखी झाला अंतरिं जिव हा सुखी झाला ॥धृ०॥
लाउनि निज नामाचा छंद । जो हरि भक्तांचा भवक्मद । दृष्यत्वातित परमानंद । तो हा प्रत्यय आला ॥जि० अ० दे० ॥।१॥
चिन्मय मूर्ति हा त्रिपुरारि । त्रिभुवन साक्षी निर्विकारि । प्रगटुनि संकट विघ्न निवारी । संरक्षी भजकांला ॥जि० अ० दे० ॥२॥
वैष्णव कृष्ण जगन्नाथाचा । ह्लद्नत हा परमात्मा साचा । नित्य विवरितां प्रिय स्वहिताच्या । ........ ॥जि० अ० दे० ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-12-16T20:54:09.1070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सुपुंजिक

  • n. एक सैंहिकेय असुर, जो विप्रचित्ति एवं सिंहिका का पुत्र था । परशुराम ने इसका वध किया [ब्रह्मांड. ३.६.१८-२२] 
RANDOM WORD

Did you know?

जननशांतीचे महत्व स्पष्ट करा ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,450
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,879
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.