मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पदे १ ते ७

पदे १ ते ७

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

पद १ लें.
अनंतकोटी ब्रह्मांडांचे नायक श्रीकृष्ण । सगुणरुपानें प्रग-टुनि दासां दावियले चरण ॥धृ०॥
सार्वभोम श्री स्थिरचर व्यापक साक्षात्‍ रघुनंदन । सर्वसाक्षि सर्वांतर्यामी निखिल निरंजन । निराककार निर्विकार सच्चि-त्सौख्य कृपेचे घन । अवतरले जडमूढांसाठीं रूप धरुनि सगुण ॥अ०॥१॥
कृपाकटाक्षें राम कृपेचें भरिलें नेत्रांजन । ज्ञानदीप प्रज्वळीत करुनी जाळियलें मीपण । चित्स्वरुपाचा मार्ग दाउनी मार्गिं लविलें जन । टळवियलें हो अज्ञ जनाचें पुनर्जन्म मरण ॥अ०॥२॥
धरिला हा अवतार प्रभूनीं नि:सं-शय जाण । दावियला पथ अति सुगमचि तो दुस्तर भव तरण । नामें प्रगटुनि महीवरी या बांदकर कृष्ण । कृष्ण बालका पदीं मुरविला होउनि स्वयें आपण ॥ अनंत कोटी ब्रह्मांडांचे नायक श्रीकृष्ण ॥३॥

पद २ रें.
कृष्ण गुरुवरें तुजला कृष्णा उपासना दिधली । चालविं रे ती नित्य सुनेमें करुनि विचार मुळीं ॥धृ०॥
उपास्य दैवत करुनि दिली तुज रामराय माउली । स्मर निशिदिनि त्या रघुरायाचे नेम व्रता चाली ॥ त्यापरि चालुनि जनां दाखवीं ब्रीद तुझें संभाळीं । वरवर करणी दाउं नकोरे देउनि जनांसि भुली ॥कृ०॥१॥
एक वचन आणि एक बाण रे एक पत्नि रक्षिली । एकव्रती श्री दशरथ नंदन विश्वप्रीय माउली । ऐशीं व्रतें श्री रघुरा-यांचीं संभाळीं तूं भलीं । नको विसंबूं तव कर्तव्यां घेउनि स्वसंगें कली ॥कृ०॥२॥
अनय पथीं तूं जाउं नकोरे सुपथरूप पाउलीं । चाल चाल रे संगें घेउनि विवेक सबळ बळी । मायापाशें  बद्ध होउनी नको पडूं तूं भुलीं । विष्णु कृष्ण जगन्नाथ गुरुंला पुजिं ह्लदयकामळीं ॥कृ०॥३॥

पद ३ रें.
पूर्णब्रह्म सद्‍गुरुराया । नित्य स्मरत मी तव पाया ॥धृ०॥
चिन्मय पाहतां रूप तुझें । उतरे माझें भव ओझें । न भीति वाटे मग जगिं या ॥पू०॥१॥
व्यापक व्रह्मांदीं सकळीं । सद्‍गुरु कृष्णा वनमाळी । प्रगट मला उद्धाराया ॥पू०॥२॥
धीर तुझा मज संसारीं । तुजविण कोण मज सहाकारी ? । अज्ञ मूढ मी धींर ह्लदिं या ॥पू०॥३॥
जन्म मरण निस्तारीता । तूंचि कृष्ण गुरु गुरुनाथा । या कृष्णा दे पदिं ठाया ॥ पूर्ण-ब्रह्म सद्‍गुरुराया । नित्य स्मरत मी तव पाया ॥४॥

( शके १८२४ आषाढ कृष्णपक्षांत हें खालील पद वै. रामचंद्र त्रि० नायक बांदिवडेकर यांस पाठविलेलें आहे. )

पद ४ थें.
वेड लविलें कृष्ण गुरुवरें श्रीरामाचें कसें । करुनि सोडिलें अंतर माझें रामरूप हो जसें ॥धृ०॥
जिकडे पहातों तिकडे रामा ! कृष्ण चरण मज दिसे । जागृति निद्रे माजि सुषुप्तीं कृष्ण कृष्ण भासे ॥ विसर पडेना क्षण-भर कृष्ण मूर्ति ह्लदयिं येतसे । किति वर्णूं वा त्या आनंदा जिव्हा अति स्फुरतसे ॥वेड०॥१॥
परब्रह्म श्री सद्‍गुरु चरण ह्लदयीं धरिले असे । जैसें उदकीं लवण टाकितां त्या स्वरुपा होतसे । कृष्ण दिनाच्या ह्लदयिं बिंबले कृष्ण चरण ते कसे । होतिल परते कल्पांतीं बा रामा ! नच भासे ॥ वेड लविलें कृष्ण दयाळें श्री रामाचें कसें ॥२॥

श्री सद‍गुस्नाथांनीं आपला पुण्य देह ठेविला हें ऐकल्यावर निघालेले खालील उद्नार !
पद ५ वें.
टाकुनि गेलां गुरो । बालका । टाकुनि गेलां गुरो ॥धृ०॥
अक्षय चिरसुख उपभोगाया गेलां हो सद्‍गुरो बा०॥१॥
धेनु पाडसा चुकते त्या परी । गती झाली सद्‍गुरो ॥बा०॥२॥
बोध सुधारस पाजुनि बाळा । वाढविल कोण श्रीगुरो ॥बा०॥३॥
कींव कशी तुज न आलि सदया । टाकाया लेकरूं ॥बा०॥४॥
कैसी गती मज होइल पुढती नकळे हें मत्‍ गुरो ॥बा०॥५॥
ने मज तवपदीं हे करुणानिधि । दीन-दयाधी गुरो ॥बा०॥६॥
कृष्ण दयाघन कृष्ण कृपाघन । कृष्णपदीं स्थीर कृष्ण किंकरू ॥बा०॥७॥

पद ६ वें.
अंतरले तव पाय । गुरुनाथा । अंतरले तव पाय ॥धृ०॥
तवपदपंकज पहाण्या अधम मी । झालों सद्‍गुरु माय ॥अ०॥१॥
घडि घडि आठव अंतरीं होउनि । ह्लदय करी बहु हाय ॥अ०॥२॥
नच घालविला काळ अल्पही । तव सान्निध्यें राय ॥अं०॥३॥
आशा मनींची खुंटुनि गेली । झाला नाहिं उपाय ॥अ०॥४॥
उभड भडभडा येती पोटीं । आवरेना गुरुराय ॥अं०॥५॥
स्वप्नमृगजला समान झालें । वीज चम-कुनी जाय ॥अं०॥६॥
हे गुरुराया सद्‍गुरु सदया । कृष्ण दयाघन माय ॥अं०॥७॥
कृष्न वासरूम हंबरतें त्या । दावीम लवकर पाय ॥८॥

पद ७ वें.
जागउनी मज गेले हो ॥धृ०॥
चिन्मयपद मज माजिं दाउनी, स्वात्मामृतिं मज नेलें हो ॥जा०॥१॥
मरण माझें मज सन्मुख ठेवुनि, ठायिं तटस्तचि केलें हो ॥जा०॥२॥
स्वानुभवामृत डोहीं ढक-लुनि चिन्मय तन्मय केलें हो ॥जा०॥३॥
विष्णुकृष्णरुप कृष्ण करूनी, त्रिजगा ऐक्यचि केलें हो ॥ जागउनी मज गेले हो ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 16, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP