मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
श्री सद्‍गुरुची आरती

श्री सद्‍गुरुची आरती

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

जयदेवा कृष्ण राया । गातों आरती ही सदया ॥धृ०॥
चिन्मय रूप तूझें । पाहुनि निवलें मन माझें । हरलें संसार भय ओझें । रूप पाहुनी अद्वया ॥ज०॥१॥
तरविले हो अज्ञजन । तया पाजुनि बोध पान । टळवीलें त्यां जन्म मरण । महाराज राजया ॥ज०॥२॥
हे दयासागरा हो । तूंचि झालां त्राता हो । तुझें नाम मुखीं राहो । कृष्ण कृष्ण गुरुराया ॥ज०॥३॥
कृष्णदास उभाद्धारीं । घेउनि आरती दों करीं । करा प्रकाश ह्लदयांतरीं । ह्मणुनी याची सद्‍गुरु पाया ॥ जयदेवा कृष्णराया ॥४॥

मी माझें लिहिणें नाहीं, दयाळा कृष्ण सद्‍गुरु । लिहिता लिहिवीता तूं, कृष्ण हा तव किंकरु ॥१॥

॥ श्रीमत्सद्‍गुरु कृष्णपदार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 16, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP