मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पवित्र उपदेश

पवित्र उपदेश

श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

श्री मुकुंदराज महाराज बांदकर यांनीं सपत्नीक तीर्थयात्रेस जाताना आपले प्रिय चिरंजीव कृष्णानंद व स्नुषा सौ. राधिका यांस केलेला पवित्र उपदेश


पद ४१ वें.
नाम तुझें बा कृष्णानंद, करुनि हरिभजन वरीं आनंद ॥धृ०॥
परस्त्री मातेसम पाहीं । याविण अन्य व्रत नाहीं । जगीं तुज उणे न मग कांहीं । होउनि शुध मना राहीं । जोडीं श्रीराघव सुखकंद ॥ ना० ॥१॥
भरवांसा नाहीं देहाचा । होइं अंकित श्रीगुरुचा । भूषविं हरिवर्णनिं वाचा । विवरीं सत्पथ सुजनांचा । नश्वर त्यजिं विषयांचा छंद ॥ ना० ॥३॥
आठवीं पितृ जनक चरणा । ठेविं त्यां समचि सदाचरणा । येउनी श्री हरिला करुणा । सुचविल उपाय भवतरणा । नुरविल देह बुद्धिचा गंध ॥ न० ॥४॥
अतिथी अभ्यागत सदनीं । येतां त्यां बहु सन्मानीं । छळिं न त्यां देवासम मानी । पुण्य बहु अन्न उदक दानीं । तोषविं प्रेमें सज्जन वृंद ॥ न० ॥५॥
आहे तितुकें देवाचें । वर्तन ठेविं निश्वयाचें । असें हें वचन समर्थांचे । झळकत दासबोधिं साचें । सद्वचसेवनिं नच निर्बंध ॥ ना० ॥६॥
माझ्या सद्‌गुरुनीं मजला । शिकविलें कथिलें तें तुजला । कृष्ण सुत विनवि सुजनाला । घ्या या पदरीं दासाला । नसे अधिकार खरा मतिमंद ॥ ना० ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : June 16, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP