मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|
पदे २९३ ते २९५

श्री जगदंबेचीं पदें - पदे २९३ ते २९५

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

पद २९३ वें.
जगदंबा मूळ माया हे भक्तांसाठीं अवतरली ॥धृ०॥
भोग सुखें जग हें नाचाया । जे नटली विषयां पांचा या । त्रिगुणात्मक जीवां वांचाया । सुविचारें उद्धराया, उपनिशदेंशास्त्रें विस्तरली ॥ज०॥१॥
जे सदसत्‍ कर्मातें फळवी । सुख विषयांतिल दु:खचि कळवी । सत्संगें आत्मपदीं वळवी । अद्वय आनंद व्हाया, विश्वीं विश्वात्मत्वें भरली ॥ज०॥२॥
स्वानु-भवें सेवुनि दिनराती । महिमा सज्जन वदती गाती । कृष्ण जगन्नाथा वरदांती । आठवितां विष्णु पाया, जन्म मरण भ्रांती निस्तरली ॥ज०॥

पद २९४ वें.
आली उदयासि ईश्वर माया, हे निज सुख द्याया, नटली हें विश्व त्रिगुणमय काया, जीवासि रमाया । विषय भोग सुख सोंग वाटउगि, अखंड ब्रह्मानंदचि व्हाया ॥आ०॥१॥
ऐसा महिमा सद्भक महंतां, आवडला संतां, भजती स्वानुभवेम त्यजुनि अहंता, प्राण्या गुणवंता । पदोपदीं जे सदोदित विषय मदोन्मत्त दैत्यांसि वधाया ॥आ०॥२॥
केला उपकारचि हा मज वाटे, आनंद दाटे, हरिले संसार दु:खमय कांटे, अद्वैत वाटे । राम विष्णु कृष्ण जगन्नाथ स्मरणें आत्मत्वांत मिळाया ॥आ०॥३॥

पद २९५ वें.
महाकाली महा सरस्वति महालक्ष्मी जगदंबा । महा आवडी पहावया ज्या सहाय भक्त कदंबा ॥म० धृ०॥
अघटित घटना शक्ति प्रगटल्या सच्चित्सुखा स्वयंभा । बाह्याभ्यंतर व्यापक लख लख प्रकाश विपुल नितंबा ॥म०॥१॥
वानिति गुण सन्मान पुर:सर सुरवर अंबाबाई । उदोउदो हा शब्द करुनियां नाचति ठाईं ठाईं ॥म०॥२॥
विष्णु कृष्ण जगन्नाथासि कळविति मिथ्या माया । शांत वृत्ति एकांत स्थितीनें आप्त सुखांत रमाया ॥म०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP