मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|प्रासंगिक कविता| मारुतीची प्रार्थना प्रासंगिक कविता रामरूपी भूत आत्मचरित्र डफगाणें शिवाजी महाराजांस पत्र. राजधर्म क्षात्रधर्म समास १ समास २ विठ्ठलरूप राम मातुश्रीस पत्र श्रेष्ठ यांस पत्र प्रासंगिक कविता -बाग प्रकरण समास १ समास २ श्रेष्ठांस पत्र मारुतीची प्रार्थना सावधता प्रकरण उत्तर ब्रह्मपिसा खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश प्रतापगडच्या भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश प्रासंगिक कविता - मारुतीची प्रार्थना समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ समर्थांस कफाची व्यथा होऊन प्रकृति फार बिघडली, तेव्हां त्यांनीं केलेली Translation - भाषांतर फणिवर उठवीला वेग अद्भूत केला । त्रिभुवन जनलोकीं कीर्तिचा घोप केला । रघुपति उपकारें दाटले थोरभारे । परम धिर उदारें रक्षिलें सौख्यकारें ॥१॥सबळ दळ मिळालें युद्ध ऊदंड झाले । कपिकटक निमालें पाहतां येश गेलें । परदळशरघातें कोटिच्या कोटि प्रेतें । अभिनव रणपातें दु:ख बीभीषणातें॥२॥कपिरिसघनदाटी जाहली थोर दाटी । म्हणवुनि जगजेठी धांवणे चार कोटी । मृतविर उठवीले मोकळे सिद्ध झाले । सकळ जन निवाले धन्य सामर्थ्य चाले ॥३॥बहु प्रिय रघुनाथा मुख्य तूं प्राणदाता । उठवी मज अनाथा दूर सारूनि व्येथा । झडकरि भिमराया तूं करीं दृढ काया । रघुविरभजना या लागवेगेंचि जाया ॥४॥तुजविण मजलगिं पाहतां कोण आहे । म्हणवुनि मन माझें तूआझि रे वास पाहे । मज तुज निरवीलें पाहिले आठवीलें । सकळिक निजदासांलागिं सांभाळवीलें ॥५॥उचित हित करावें उद्धरावें धरावें । अनुचित न करावें त्वां जनीं येश ध्यावें । अघटित घडवावें सेवका सोडवावें । हरिभजन घडावें दु:ख तें वीघडावें ॥६॥प्रभुवर विरराया जाहली वज्रकाया । परदळ निवदाया दैत्यकूळें कुडाया । गिरिवर तुडवाया रम्य वेशें नटाया । तुजचि अलगडाया ठेविलें मुख्य ठाया ॥७॥बहुत सकळ सांठा भागतों अल्प वांटा । न करित हित कांटा थोर होईल ताठा । कृपणपण नसावें भव्य लोकीं दिसावें । अनुदिन करुणेचें चिन्ह पोटीं वसावें ॥८॥जलधर करुणेचा अंतरामाजिं राहो । तरि तुज करुणा हे कां नये सांग पां हो । कठिणहदय झालें काय कारुण्य केलें । न पवसि मज कां रे म्यां तुझें काय केलें ॥९॥वडिलपण करावें सेवका सांवरावें । अनहित न करावें तूर्त हातीं धरावें ।निपटचि हटवावें प्रार्थिला शब्दभेदें । कपि घन करुणेचा वोळला राम तेथें ॥१०॥बहुतचि करुणा ही लोटली देवराया । सहजचि कफ गेलें जाहली दृढ काया ।परम सुख विलासे सर्वदा दास. नूसे । पवनज तनुतोषें वंदिला सावकाशें ॥११॥ N/A References : N/A Last Updated : April 01, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP