मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|प्रासंगिक कविता| समास २ प्रासंगिक कविता रामरूपी भूत आत्मचरित्र डफगाणें शिवाजी महाराजांस पत्र. राजधर्म क्षात्रधर्म समास १ समास २ विठ्ठलरूप राम मातुश्रीस पत्र श्रेष्ठ यांस पत्र प्रासंगिक कविता -बाग प्रकरण समास १ समास २ श्रेष्ठांस पत्र मारुतीची प्रार्थना सावधता प्रकरण उत्तर ब्रह्मपिसा खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश प्रतापगडच्या भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश कारखाने प्रकरण - समास २ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ सामनगडावर किल्ला बांधतांना सांगितलेलें Translation - भाषांतर यादी इमारतीकारणें । काय काय लागे करणें । श्रीती अवधान देणें । म्हणे वक्ता ॥१॥द्रव्य पारपत्य खबरदारी । सत्तासामर्थ्य वेट बेगारी । गंवटी पाथरवट लोणारी । बेलदार कोळी ॥२॥लोहार सुतार कुंभार । कामगार लहान थोर । मांग महार चांभार । नाना याती ॥३॥घन कुदळी संबळ । कुराळी पारा गुठी गोल । टांक्या हातोडे लोळ । लोह पोलादाचे ॥४॥विळे पायळे कुराडी । कुराडी । खुरपीं धाप्या धांवा वेडी । खिळे हलके गांघे गाडी । खोरें सनभ पावडी ॥५॥तर्फा दांडे भुंगाळ्या नाटा । चोपणीं बडवणी धुमस खाटा । चाळण्या पांटया बंधली साठा । नाना प्रकारीचे ॥६॥सर कोडके कळक चिवे । फळया चांफ चौफळे व्हावे । चवरंग चवक्या पाट करावे । नाना गिलाव्याचे ॥७॥जातीं शिळा वांटणीं । चाटू डंगारणीं घांटणीं । तस्ते पाळीं लाटणीं । कळक मापें तराजु ॥८॥कोळसे भटया लांकडे । शिरटी फेस झाडेंझुडें । नाना इमारतींचें सांकडे करतां जाणे ॥९॥चुना चिरे वाळू कंकरे । पारडया चिपा लहान थोर । धोंडे गुंडे माती नीर । रांजण डेरे घागरी ॥१०॥मडकीं कुंडालीं गाडगे । परळ वेळण्या मांडण मोघें । विटा चुना खरुस लागे । झेल इमा-रतीसी ॥११॥गूळ कात हिरडे ताग । उडीद नाचण्या डीक याग । वजन हिशेबें यथासांग । केलें पाहिजे ॥१२॥तीळ राळे आणि भात । चिकणा माता आरक्त । राख लीद बळग्या मिश्रित । कमावून विटा कराव्या ॥१३॥तिकोन्या चौकोन्या लहान थोर । भाजून भिज-वन सुंदर । तिकया ओळंबे धरून सूत्र । इमारती कराव्या ॥१४॥चौकटया मेहरबा ताक-बंदी । विटेबंदी चिरेबंदी । लोहबंदी शिसेबंदी । नीट नेमस्त उभार ॥१५॥कांचबंदी पांचबंदी । नाना रत्नें सुवर्णबंदी । नाना दर्पणें विचित्र बंदी । नाना चित्रलेखन ॥१६॥तोंड रचाया बळ कुसरी । चित्रविचित्र वोवरी । कमळें पानें परोपरी । एकाहूनि एक ॥१७॥कल-बुद लावण्या बळकट । जालंधरें झरोके सोनवट । घोटघोटेनि लखलखाट । सुरु सनाबदाचे ॥१८॥धाबें देउळें शिखरें । उंच गोपुरें मनोहरें । वापी पोखरणी सरोवरें । हमामें स्थान कारंजी ॥१९॥गड कोठे महाल मटया । गुप्तद्बारे अंतरशिडया । छत्र्या लादण्याच्या तबकडया । नाना भुयारीं विवरें ॥२०॥धनधान्यरसखाने । दारूखाने जामदारखाने । नाना अठरा कारखाने । घुमट मशीदी मनोहर ॥२१॥चित्रशाळा नाटकशाळा । भोजनशाळा होमशाळा । पाठशाळा धर्मशाळा । नाना इमारती ॥२२॥ओटे चौथरे वृंदावनें । कुंचे दाखटे भुवनें । नानाप्रकारचीं स्थानें । चांदवा पट कोट भडकले ॥२३॥धरणें सांकू कालवे । नदीतीरी पंथ बांधावे । दीपमाळा चौक बांधावे । हुंडे खानगे मदालसा ॥२४॥गढया गुंफा कपाटें लेणीं । देवदैत्यमानवकरणीं । समाधींमाझारीं धरणी । कोणे पाहिली ॥२५॥ N/A References : N/A Last Updated : April 01, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP