मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|प्रासंगिक कविता| क्षात्रधर्म प्रासंगिक कविता रामरूपी भूत आत्मचरित्र डफगाणें शिवाजी महाराजांस पत्र. राजधर्म क्षात्रधर्म समास १ समास २ विठ्ठलरूप राम मातुश्रीस पत्र श्रेष्ठ यांस पत्र प्रासंगिक कविता -बाग प्रकरण समास १ समास २ श्रेष्ठांस पत्र मारुतीची प्रार्थना सावधता प्रकरण उत्तर ब्रह्मपिसा खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश प्रतापगडच्या भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश प्रासंगिक कविता - क्षात्रधर्म समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ शिवाजीमहाराजांची भेट झाली तेव्हां समर्थांनी उपदेश केला तो Translation - भाषांतर अल्पस्वल्प संसारधर्म । मागां बोलिलों राजधर्म । आतां ऐका क्षात्रधर्म । परम दुर्लभ जो ॥१॥जयास जिवाचें वाटे भय । त्यानें क्षात्रधर्म करूं नये । कांहीं तरी करूनि उपाय । पोट भरावें ॥२॥विन्मुखमरणीं नर्क होती । वांचून येतां मोठी फजिती । इहलोक परलोक जाती । पाहाना कां ॥३॥मारितां मारितां मरावें । तेणें गतीस पावावें । फिरोन येतां भोगावें महद्भाग्य ॥४॥नजरकरार राखणें । कार्य पाहुनी खतल करणें । तेणें रणशूरांचीं अंत:करणें । चकित होती ॥५॥जैसा भांडयांचा गलोला। निर्भय भारामध्यें पहिला । तैसा क्षत्री रिचवला । परसैन्यामध्यें ॥६॥नि:शंकपणें भार फुटती । परवीरांचे तबके तुटती । जैसा बळिया घालूनि घेती । भैरी उठतां ॥७ऐसे अवघेच उठतां । परदळाची कोण चिंता । हरणें लोळवी चित्ता। देखत जसा ॥८॥मर्दै तकवा सोडूं नये । म्हणजे प्राप्त होतो जय । कार्यप्रसंग समय ओळखावा ॥९॥कार्य समजेना अंतरें । ते काय झुंजेल बिचारें । युद्ध करावे खबरदारें । लोक राजी राखतां ॥१०॥दोन्हीं दळें एकवटें । मिसळताती लखलखाटें । युद्ध करावें खबरदारें । सीमा सांडूनी ॥११॥देवमात्र उच्छेदिला । जित्यापरीस मृत्यु भला । आपुला स्वधर्म बुडविला । ऐसें समजावें ॥१२॥मराठा तितका मेळवावा । आपुला महाराष्ट्रधर्म वाढवावा । येविषयीं न करितां तकवा । पूर्वज हांसती ॥१३॥मरणहांक तों चुकेना । देह वांचविताम वांचेना । विवेका होऊनि समजाना । काय करावें ॥१४॥भले कुळवंत म्हणावें । तेंहीं वेगीं हजीर व्हावें । हजीर न होतां कष्टावें लागेल पुढें ॥१५॥एक जाती दोन जाती पावला । तो कैसा म्हणावा भला । तुम्हां सकळांस कोप आला । तरी क्षमा केला पाहिजे ॥१६॥देवद्रोही तितुके कुत्ते । मारूनि घालावे परते । देवदास पावती फत्ते । यदर्थीं संशय नाहीं ॥१७॥देव मस्तकीं धरावा । अवघा हलकल्लोळ करावा । मुलूखबडबा कां बडवावा । धर्मसंस्थापनेसाठीं ॥१८॥विवेक विचार सावधपणें । दीर्घ प्रयत्न केलचि करणें । तुळजावराचेनि गुणें । रामें रावण मारिला ॥१९॥अहो हे तुळजा भवानी । प्रसिद्ध रामवरदायिनी । रामदास ध्यातो मनीं । यन्निमित्त ॥२०॥ N/A References : N/A Last Updated : April 01, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP