मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|प्रासंगिक कविता| मातुश्रीस पत्र प्रासंगिक कविता रामरूपी भूत आत्मचरित्र डफगाणें शिवाजी महाराजांस पत्र. राजधर्म क्षात्रधर्म समास १ समास २ विठ्ठलरूप राम मातुश्रीस पत्र श्रेष्ठ यांस पत्र प्रासंगिक कविता -बाग प्रकरण समास १ समास २ श्रेष्ठांस पत्र मारुतीची प्रार्थना सावधता प्रकरण उत्तर ब्रह्मपिसा खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश प्रतापगडच्या भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश प्रासंगिक कविता - मातुश्रीस पत्र समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ पंढरीहून लिहिलेलें Translation - भाषांतर सकल गुणांचा निधि । निर्गुणाची कार्यसिद्धि । विवेकाची दृढबुद्धि । तुझोनि गुणें ॥१॥तूं भवसिंधूचें तारूं । तूं भक्तांचा आधारू । तूं अनाथाचे अवसरू । वैष्णवी माया ॥२॥तूं भावार्थाची जननी । तूं विरक्तांस जीवनी । तूं परमार्थाची खाणी । भजनशीळ ॥३॥तूं सर्व सुखांची मूस । तूं आनंदरत्नांची मांदूस । तुझेनि चुकती सायास । संसारींचे ॥४॥तूं परमार्थाविषयीं आग्रगण । सद्रुरु दासांचें मंडण । समाधानाची खूण । अंतरीं वसे ॥५॥सत्संगासी सादर । भक्तिमार्गासी तत्पर । धूर्त कुशळ अति सादर । परोपकारी ॥६॥श्रीगुरुभजनीं तत्पर । स्वामिकृपा निरंतर । म्हणोनि शुद्ध क्तियेचा उद्धार तुमचे ठायीं ॥७॥आत्मचर्चेसी मुगुटमणी । अत्यंत सादरता निरूपणीं । बोलणें अमृत वाणी । मृदु चचनीं ॥८॥विवेकनिधि केवळ । अंतर शुद्ध निर्मळ । ज्ञानदीप प्रबळ । तुमचे ठायीं ॥९॥क्रियाशुद्धि निर्मळ मन । निरभिमानी परम सज्जन । निरंतर अनुसंधान । अंतरीं वसे ॥१०॥भावार्थाचें आगरू । प्रबळ शांतीचा सागरू । पाहतां उपमे मेरू । तोही उणा ॥११॥ N/A References : N/A Last Updated : April 01, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP