मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री वेंकटेश्वर| पदे १६१ ते १७० श्री वेंकटेश्वर पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १९० पदे १९१ ते २०० पदे २०१ ते २१० पदे २११ ते २२३ श्री वेंकटेश्वर - पदे १६१ ते १७० श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्यातून मुक्ति मिळते. Tags : balajitirupativenkateshतिरूपतिबालाजीवेंकटेश पदे १६१ ते १७० Translation - भाषांतर १६१कोणी त्रिमलाचारे नामें ब्राह्मण । जो का सदाचारसंपन्न ।षट्कर्मे आचरोन । बेलगुप्पी गावीं जाण राहतसे ॥जो सत्तवगुणी आणि भाविक । वेंकटाचलीं अवतरला देख ।भक्तजनांचा प्रतिपालक । तो वैकुंठनायक सदा चिंती ॥तयाची असे साधारण वृत्ती । त्या़तचि करी उदरपूर्ती ।आन्मद मानूनिया चित्तीं । सदा तृप्ती मानितसे ॥१६२तव इच्छा वेंकटगिरीवरी । जावयाची असे खरोखरी ।परिश्रम घेऊनि इतुक्या दूरी । भूदेवा, निर्धारी जाऊ नको ॥शूरपाल नामें क्षेत्र । काशीसमान असे पवित्र ।तेथील नृसिंहदेवाचे चरित्र । प्रसिद्ध सर्वत्र जगतीं या ॥तेथे जाऊन कृष्णास्नान । करूनि विप्रा, शुचि होऊन ।घ्यावें देवतादर्शन । तसेच पूजनही करावे ॥कृष्णादक्षिणतीरीं देख । द्बय अर्ध कोशावरी सम्यक ।कल्हळी नामें खेटक । गिरीवरी एक वसते ॥नागणैयाख्य श्रेष्ठ भक्त । ईशदर्शनार्थ वाट पाहत ।राहिला असे, तूही तेथ । जावें त्वरित विप्रेंदा ॥१६३अश्विन वद्य त्रयोदशीसी । यात्रा परत आली, त्या दिवसीं ।त्रिमलाचारी त्यांचे संगतीसी । शूर्पालक्षेत्रा पावला ॥अग्रत: देखिले नृसिंहभवन । शोभतसे दैदीप्यमान ।पुढे गेला कृष्णा उतरून । श्रीपुढे लोटांगण घातले ॥दक्षिणाभिमुख नृसिंहरूपी वेंकटपती । बसले, कोटिसूर्यासम दीप्ती ॥सव्यभागी बैलेश्वर गणपती । तेवीं केशव वराहमूर्ती विराजे ॥वामभागीं श्रीरामचंद्रमूर्ती । पश्चाद्भागीं गरुड मारुती ।उभे कर जोडोनिया तिष्ठती । अश्वत्थवृक्ष पुढती शोभतसे ॥अभिमुख पूर्ववाहिनी कृष्णानीर । वाहतसे स्वच्छंदें । स्थिरस्थित ।स्नानपानें भवभयहर । तटीं घाट सुंदर शोभतसे ॥सिंहासनीं नृसिंहदेव विराजती । चतुर्भुज, श्यामवर्ण कांती ।अंकीं भार्गवी शोभती । जे चिच्छक्ती-आदिमाया ॥स्नान करोनिया घाटावर । येवोनि पूजिती नारीनर ।सप्रेम नमिती वारंवार । पाहूनि द्बिजवर तोषला ॥करोनिया आपण कृष्णास्नान । नृसिंहदेव पूजिला प्रेमेंकरोन ।येणेपरी दिनत्रय जाण । तये स्थानीं ब्राह्मण राहिला ॥१६४परंपरें आम्ही शिवभक्त । शिवोपासनीं अनुरक्त ।आता केलिया विपरीत । गुरु-देवता क्षोभतील की ॥लोक निंदतील परम । म्हणतील ‘झाला उद्दाम ।सोडिला आपुला कुलधर्म । झाला बेशरम’ वदतील की ॥तैसेच सर्व गणगोत । ‘भांग उगवे तुळसीत ।तसा झाला आमुचे वंशात ’ । म्हणूनि समस्त हसतील की ॥मोडू जरी तयाचे वचन । तरी ब्रह्मैयारूपी भगवान ।रुष्टेल, सत्यत्वेंकरोन । अनुभव पूर्ण मज आला ॥१६५पार्वती आणि लक्ष्मीपती । ही सहोदर जाण निश्चितीं ।तू विष्णुपूजा करशील ती । पार्वतीअपचिती ( ? ) जाण पां ॥यास्तव वैष्णवी दीक्षा घेवोन । हदयातील कल्मष टाकोन ।करीत रहावे विष्णुपूजन । तेणें अपर्णा पूर्ण संतोषे ॥कर्पूरगौर, शंखचक्रधर । गिरिजापती, इंदिरावर ।दोघे एकचि साचार । हा मनीं निर्धार असो दे ॥१६६माझी झाली निभ्रांत मती । आता कोणाची काय भीती ।तप्तमुद्रा घेईन निश्चितीं । म्हणोनि स्वस्थ चित्तीं राहिला ॥तों ऐकिली सुवार्ता । वैष्णव स्वामी येतील आता ।तेव्हा म्हणे ‘स्वामी समर्था । मम इच्छितार्था पुरवावे’ ॥श्रीस्वामी रघुनाथतीर्थ । हे देशदिग्विजय करीत ॥आले जंबूप्रांतात । तेणें आनंदित नागरस ॥आपण पुत्रादि ( सवें ) घेवोन । घेतले स्वामिचरण दर्शन ।विनवोनिया कर जोडोन । तप्तमुद्राधारण पै केले ॥सवें उपदेश घेवोन । वंदोनिया श्रीचरण ।श्रीमन्मध्वग्रंथादि जाण । करीत श्रवणपठण राहिला ॥१६७परशुरामभाऊचे पदरीं देख । होते येसाजी रघुनाथ नामक ।कौशिकगोत्री, उपनाम फाटक । चाकरी मन:पूर्वक करोनी ।भास्करपंत तयांचे सुत । तत्पुत्र दामोदरपंत ।ज्यांहीं मिळविली सुकीर्त । जमखंडीपतिसेवेत पां ॥मजसह चार पिढयांवरी । करीत आलो श्रीमंतांची चाकरी ।लहानमोठी कामे परोपरी । केली मन:पुर:सरी विश्वासें ॥पाचव्या पिढीचा श्रीपती । भाऊंची पंचम संतती जंबुपती ।हल्लीचे भाऊसाहेब गुणज्ञ नृपती । त्यांची सेवा यथामती करिताहे ।असो, तो दामोदर माझा पिता । सगुणा सुसती माझी माता ।उभयतांचे चरणीं माथा । ठेवोनिया सुचरिता संपविले ॥शके सत्राशे सदतीस । संवत्सर नाम राक्षस ।शुद्ध पक्ष श्रावणमास । पौर्णिमा, भौम दिवस तद्दिनीं ॥१६८शेषाचलगतो विष्णु: सद्भक्तै: प्रार्थित: पुरा ।कर्णाटदेशमागत्य रमया सह मोदते ॥शूर्पारकक्षेत्रसमीपभागे क्षेत्रं पवित्रं किल जंबुखंडम् ।तस्यैव पार्श्वे गिरिमूर्ध्नि देवो विराजते श्रीपतिवेंकटेश: ॥१६९महाराष्ट्रीयभाषायां हरिफाटकसूरिणा ।वर्णितं तत्समाश्रित्य देववाणी प्रवर्तते ॥जंबूपुराधिपस्यासौ प्रधानामात्यपीठभाक् ।जयतान् माधवो येन प्रेरितोऽस्मीह कर्मणि ॥राज्याधिकारे महति स्थाने स्थाने नियोजित: ।अमात्यपदवीं प्राप्तो लभतां यथ उत्तमम् ॥स्वयं सदाचाररत: शास्त्राध्ययनशीलवान् ।अन्येषां पुण्यकार्येषु साह्यं कुर्वन् प्रवर्तते ॥मंदोत्साहमसौ ज्ञात्वा विषीदंतं तथा च माम् ।पुन: पुन: सद्वचनैरुत्तेजयति सत्कृतौ ॥एवं माधवरायेन लेखनेऽस्मिन् प्रवर्तित: ।प्रारब्ध्स्यान्तगमने साधनं भगवत्कृपा ॥१७०त्वत् कृपां महतीं लप्स्य इत्याशा ह्रदि मे प्रभो ।तेनेदं तव चारित्रं यथामत्यनुवर्णये ॥‘अश्म’ कर्णाटभाषायां ‘कल्ल’ इत्यभिधीयते ।‘हळ्ळी’ति खेटकं, तेन ‘कल्हळ्ळी’ त्यश्मखेटकम् ।अश्मखेटकसान्निध्ये स्थितो वेदगिरिर्महान् ।तत्र श्रीवेंकटेशस्य स्थानं परमपानम् ॥ N/A References : N/A Last Updated : March 14, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP