TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

श्री वेंकटेश्वर - पदे १७१ ते १८०

श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.


पदे १७१ ते १८०
१७१
जाऊ, पाहू कल्हळी ग्रामीं
व्यंकोबा देव असे ॥ध्रु.॥
आला अश्र्विनाचा महिना,
भेटूं चला पुरुषोत्तमा ।
यात्रेची गर्दी असे,
अहो बाई, दर्शनाची गर्दी असे ॥१॥

१७२
पायथ्याशी जलकुंड,
उजवीकडे तो गोविंद,
घर बांधून जरा थांब,
परब्रह्म डोळां दिसे ॥२॥
वर गेला भक्तमेळा,
पहावया घननीळा,
प्रसन्नता हदयाला,
भक्तांची दाटी असे ॥३॥

१७३
लक्ष्मी ती राही दूरी,
गरुड उभा महाद्बारीं,
नवरात्र उत्साहाची
अपूर्व शोभा दिसे ॥४॥
अश्र्विनाच्या दशमीला,
आनंद तो यमुनेला,
व्यंकोबाच्या दर्शनाला
प्रतिवर्षीं जात असे ॥५॥

१७४
य: प्रादुस्ति भवसागरत: स्वभक्तान्‍
उद्धर्तुमत्र रमयाश्रितवामभाग: ।
श्रीवेंकटाख्यपुरिशैलवनावकीर्णे
तं वेंकटेशमनिशं हदि भावयामि ॥१॥

१७५
लोकं समीक्ष्य कलिकालहतानुभावं
श्रीशेषशैलमणि गंतुमशक्नुवंतम्‍ ।
श्रीविश्वमंगलवपु: प्रकटींचकार
तं वेंकटेशमनिशं हदि भावयामि ॥५॥

१७६
प्रणीतायास्तटे नद्या मेघंकरमिति श्रुतम्‍ ।
नगरं गरिमाधारं तुंगप्राकारगोपुरम्‍ ॥
विशालाश्रमशालासु स्वर्णस्तंभविभूषितम्‍ ।
श्रीमद्‍ भि: सुखिभि: शांतै: सदाचारैर्जितेंद्रियै: ॥
अधिष्ठितं जनैश्चारुशृंगारकमनोहरम्‍ ।
कीर्तिस्तंभस्फुरत्स्वर्णसुपर्णशतशोभितम्‍ ॥

१७७
मूर्तिमत्‍ परमं ब्रह्म जगल्लोचनजीवितम्‍ ।
लक्ष्मीनयनराजीवपूजिताकारगौख: ॥
त्रिविक्रमवपुर्मेघश्यामल: कोमलाकृति: ॥
श्रीवत्सवक्षा राजीववनमालविभूषित: ॥
अनेकभूषणोपेत: सरत्न इव वारिधि: ॥
चलत्सौदामिनीदामसांद्रमेघसमद्युति: ॥
तस्याऽस्ते मुकुटे साक्षाच्छाड्‍.र्गपाणि: पर: पुमान्‍ ।
तं दृष्ट्‍वा मुच्यते ज्मतुर्जन्मसंसारबंधनात्‍ ॥

१७८
यस्मिन्‍ पुरे महातीर्थं विद्यते मेखलभिधम्‍ ।
यत्र स्नात्वा नरैर्नित्यं प्राप्तते वैष्णवं पदम्‍ ॥
तत्र वीक्ष्य जगन्नाथं नरसिंहं कृपार्णवम्‍ ।
सप्तजन्मार्जिताद्‍ घोरान्‍ मुच्यते दुष्कृतान्‍ नर: ॥
मेखलायां गणाधीशं विलोकयति यो नर: ।
स निस्तरति विघ्नानि दुस्तराण्यपि सर्वदा ॥

१७९
तीर्थं मेघंकरं नाम स्वयमेव जनार्दन: ।
यत्र शाड्‍.र्गधरो विष्णुर्मेखलायामवस्थित: ॥

१८०
विष्णुधाकें लोणासुर पळत ॥ पूर्वेस जाउन लपत ॥
मग विष्णु धावून धरीत । तया धनुष्य लाऊनि त्वरित ॥
युध्द झाले अति प्रखर । बाण वर्षती जैसे मुदीर ।
जैसा प्रलय वैश्र्वाआनर । तैसा श्रीधर समरांगणीं ॥
लोणासुराचे शर-कार्मुक । शरीं तोडिले मन्मथजनकें ।
मग तो दैत्य पळे नि: शंक । अति धाकें सिंहाचळीं ॥
सवेंच पाठीशी शारंगधर । लाग करी तो अति प्रखर ।
पुढे पळतो लोणासुर । गिरिशिराखीं लपतसे ॥
मग देखिली एक टेकोळी । लोण तो दडला तयातळीं ।
तेथे जाऊनि कौस्तुभमौळी । पायें टेकोळी उडविली ॥
मग तो दैत्य पादकमळीं । मर्दिता झाला विशाल तळीं ।
प्राण जाता निजबळीं । घनसावळा प्रार्थिला हो ॥
‘माझेनि रुधिरें तुझे पाय । उत्तम भरले निरामय ।
ते मजवरी जान्हवीतोय । क्षाळूनि, सोय करी बा तू ॥
आज सोमवती अमावशी वार शशी । येथे आणी तू वाराणशी ।
पादतीर्थें पुनीतराशी । करी जन्माशी माझिया तूं’ ॥
ते मानोनि हषीकेशीं । त्वरें आणिली वाराणशी ।
तीर्थें स्थान वैकुंठवासी । मुक्ती दैत्यासी समर्पिली ॥
तेंचि अद्यापि सोमवती । जाणावी त्या लोणार तीर्थीं ।
असे लोणासुरास स्वहस्तीं । वैकुंठपतीने मारिला ॥

Translation - भाषांतर

References : N/A
Last Updated : 2014-03-14T00:10:04.1800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

floatation circuit

 • प्लवन परिपथ 
 • तरण परिपथ 
RANDOM WORD

Did you know?

तीन रस्ते एकत्र येऊन मिळतात, त्या ठिकाणास काय म्हणतात
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.