मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री वेंकटेश्वर| पदे ६१ ते ७० श्री वेंकटेश्वर पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १९० पदे १९१ ते २०० पदे २०१ ते २१० पदे २११ ते २२३ श्री वेंकटेश्वर - पदे ६१ ते ७० श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्यातून मुक्ति मिळते. Tags : balajitirupativenkateshतिरूपतिबालाजीवेंकटेश पदे ६१ ते ७० Translation - भाषांतर ६१सुंदरा व्यंकटेशा, तुम्ही त्रैलोकीं राजे ।रंक मी शरण तुम्हां, हरा क्लेश जी माझे ॥ध्रु.॥शेषाद्रीं सिंहासनीं तुम्ही बैसले देवा ।इंद्रादि सकळही देव करिताती हो सेवा ॥उजळोनि आरतिया लागताती हो पायां ।जयजयकार करिती श्रीवैकुंठराया ॥१॥६२अणिमादी सकळ सिद्धी वारिताती चामरे ।इंद्र हा घेउनि छत्र उभा राहे माघारे ॥उर्वसी नृत्य करी स्वयें राये साचारे ।गर्जती वेद चारी श्रुतिच्यानि गजरें ॥२॥६३तांडव नृत्य करी गणाधीश आपण ।शारदा घेऊनि टाळ करी अनुवादन ॥नारद घेऊनि वीणा वदे सामगायन ।किन्नर वाजदंडी ( ? ) सप्तस्वर साधन ॥३॥६४रुद्र हा भद्र जेथे, यम न्यायें विचारी ।विरिंची सहवास छत्र घेउनि करीं ॥चंद्रमा सूर्य दोन्ही द्वारपाळ हो द्वारीं ।विडिया करुनी देती रमा आपल्या करीं ॥४॥६५ऐसा हो राजसोहळा नित्य होतो वैकुंठीं ।आनंद थोर न मायेचि पोटीं ॥धन्य हा जन्म माझा, देव देखिला दृष्टीं ।गोविंदतनयें गिरीं, धन्य धन्य हे सृष्टी ॥५॥६६जय देव जय देव जय व्यंकटेशा ।संकट सर्वहि वारुनि तोडी भवपाशा ॥ध्रु.॥रत्नखचित मुकुट मस्तकावरि साजे ।कानीं कुंडल, तेजें पाहुनि रवि लाजे ॥१॥तनु सावळी, कटिं वेष्टित पीतांबर पिवळा ।त्रिपुटी नामावरती कस्तुरीचा टिळा ॥२॥रत्नादिक बहु माला कंठीं वैजयंती ।‘गोविंदा, गरुडध्वजा’ म्हणुनी दीन बाहती ॥३॥पुष्करिणीतीरवासा शेषाद्रिनाथा ।अभयकराने निववी दीन माणिक आता ॥४॥६७वेंकटेशनाम मंत्र जपुनिया मुखीं ।जा भवाब्धि उडुन, राहि होउनी सुखी ॥ध्रु.॥वेंकटे शवदनकमळ पाहुनी तया ।चरणकमलिं शिर-सुकमळ अर्पुनी भया ॥करुनि सांड, तत्क्षणीचं रे भवाचि ह्या ॥राहि धरुनि हदयकमलिं रूप आणखी ॥१॥६८हिरण्याक्ष बघुनि, तारुनी महीस हा ।आवरोनि उग्र कोलरूप ते महा ॥भक्तकामकल्पवृक्ष होउनी पहा ।धरि स्वरूप सौम्य, जाइं त्यासि पारखी ॥२॥चतुर्भुज श्यामसुंदर आकृती बरी ।धरुनि राहिलासे वेंकटाचलावरी ॥शोभिवंत दिसति मूर्ति ध्यानिं अंतरीम ।वेंकटेशबालका सदैव नीरखी ॥३॥६९उठा उठा हो भक्त साधक । स्मरा श्रीवेंकटनायक ।भक्तजनप्रतिपालक । नटनायक श्रीवेंकटेश ॥ध्रु.॥वैकुंठविहारी श्रीभगवान । आदिनारायण शेषशयन ।क्षीरोदवासी गरुडवाहन । दुष्टदमन श्रीहरी ॥१॥होउनिया वराहवदन । दैत्य हिरण्याक्ष विदारून ।भूमिदेवीतें उद्धरून । दाढें उचलून आणिली ॥२॥अतिभयंकर कोलवदन । भय पावती सर्वही जन ।पाहून भवभयशमन । कृपाघन सुस्वरूप होतसे ॥३॥गरुडातें आज्ञापून । क्रीडाचल वैकुंठाहून ।आणून, शेषाचळीं स्थापून । अभयदाना उभा असे ॥४॥७०चतुर्भुज मूर्ति साजिरी । धनश्यामवर्ण मनोहरी ।नानालंकार अंगावरी । कृपा करी भक्तजनां ॥५॥आकर्ण कमलदलनयन । कृपादृष्टी सुहास्यवदन ।भक्तजनमानसमोहन । देऊं दर्शन उभा असे ॥६॥भवकारक भवहारक । लक्ष्मी-भूमि-नायक ।वेंकटेश कुलपालक । सुखकारक वेंकटेश ॥७॥ N/A References : N/A Last Updated : March 13, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP