मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री वेंकटेश्वर| पदे १३१ ते १४० श्री वेंकटेश्वर पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १९० पदे १९१ ते २०० पदे २०१ ते २१० पदे २११ ते २२३ श्री वेंकटेश्वर - पदे १३१ ते १४० श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्यातून मुक्ति मिळते. Tags : balajitirupativenkateshतिरूपतिबालाजीवेंकटेश पदे १३१ ते १४० Translation - भाषांतर १३१धनुर्मासाचे सित पक्षात । द्बादशी तिथी पर्व विख्यात ।ब्रह्मादि सुरवर इच्छित । तया तीर्थाचे स्नान पै ॥५.९६॥जितुकी तीर्थे पृथ्वीवर । ती येथेचि वसती निरंतर ।ऐसे स्थळ पाहूनि श्रीधर । राहों इच्छी तये स्थानीं ॥९७॥तीर्थासमीप सुरेख । तिंतिणी वृक्ष असे एक ।तयाखाली वल्मीक । होते जाण निर्धारीं ॥९८॥त्या वल्मीकाचे अंतरीं । प्रवेशता झाला मुरारी ।गुप्तरूपें ते अवसरीं । तया स्थळीं राहिला ॥१९॥१३२आंदणालागी राजेंद्र । मुकुट एक देईन परिकर ।आठां दिवशीं भृगुवारीं । मुकुट मस्तकीं घालीन मी ॥१९५॥त्या वेळीं दर्शनासी । तू येत जाई निश्चयेंसी ।तेव्हा क्षणमात्र सुख तुजसी । होईल जाण राजेंद्रा ॥१९६॥ऐसा उच्छाप वदोन । गुप्त जाहला जनार्दन ।राव पिशाच होवोन । वनामाजीं राहिला ॥१९७॥१३३मी एकलचि वसतो येथे । कोणीच नाही मज सांगातें ।रहावयासी स्थळ यथार्थ । तेही न मिळे जाण पां ॥२१६॥तरी या पर्वतावरी देखा । मज ठाव देई भूमिपाळका’ ।वराह म्हणे, ‘जगन्नायका । अवश्य राही येथेचि’ ॥२१७॥मग नगमस्तकीं यथार्थ । शतपाद भूमी हरीसी अर्पित ।तया स्थळीं क्षीराब्धिजामात । राहता जाहला ते काळीं ॥२१८॥१३४द्वादशाध्यायपर्यंत । जाहला वेंकटेशविजय ग्रंथ ।जय पुरुषोत्तमा वैकुंठनाथ । तुज प्रीत्यर्थ हो का सदा ॥१२.९७॥वेंकटेशविजय राजेश्वर । हे द्वादश त्याचे प्रंचड वीर ।महत्पापांचे संहार । श्रवणमात्रें करिती ते ॥१८॥१३५जय देव जय देव जय वेंकटराया ।संकटविलया सदया अहिपतिगिरिनिलया ॥ध्रु.॥भूसुरवरपदताडन मिमित्त हे करुनी ।भूमीवरी पातली भुवनत्रयजननी ।भुजगारिवाहना तू तद्विरहेंकरुनी ।भूतलीं या आलासे वैकुंठाहूनी ॥१॥१३६वर्ष दशसहस्त्र वल्मीकीं क्रमिले ।वज्रपाय मौळीवरि प्रहार तू धरिले ॥वत्सासह गोरूपी देवां रक्षियले ।वराहमत्ते वसुधाधर गिरिवरि वसले ॥२॥अष्टविंशति कलिच्या आधी प्रकटोनी ।अवतार नटलासी अनुपम्य अवनीं ॥अश्र्वारूढ क्रमिता अरण्यस्थानीं ।आकाशनृपतनुजा अवलोकिलि नयनीं ॥३॥१३७ऐकुनि हरिगुण पावे नृप परमानंदा ।अत्यादरें अर्पियली कन्या गोविंदा ॥अद्यापि अक्षय तू आनंदकंदा ।आत्मारामा कुडची श्रीवीरवरदा ॥५॥१३८सहजबोधाचा आत्मकुमर । शिवकल्याण योगेश्वर ।वयसां सात संवत्सर । दर्शन जाले अंबेचे ॥११.२२५॥गोपाळादि त्याचे वंशीं । ज्ञान-विज्ञान-तेजी राशी ।तेथेचि उद्भव शिवरामासी । अत्रितनयासी जो साम्य ॥२॥१३९व्यासवाणी आदिशक्ती । आदिमाया जे भगवती ।मातृकापटीं अमृतमती । तदाधारें चालतसे ॥व्यासवाणीचा मथितार्थ । भाषा मात्र हे प्राकृत ।जाणोनि खर्परीं नवनीत । टाकी पंडित, हे न घडे ॥१४०बंकार म्हणजे अमृतबीज । कट ऐश्वर्य संज्ञा सहज ।प्रथम मीळणी, म्हणोनि गुज । व्यंकटाद्रि हे घडले ॥१.५६॥ N/A References : N/A Last Updated : March 14, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP