मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री वेंकटेश्वर| पदे ४१ ते ५० श्री वेंकटेश्वर पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १९० पदे १९१ ते २०० पदे २०१ ते २१० पदे २११ ते २२३ श्री वेंकटेश्वर - पदे ४१ ते ५० श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्यातून मुक्ति मिळते. Tags : balajitirupativenkateshतिरूपतिबालाजीवेंकटेश श्री वेंकटेश्वर - पदे ४१ ते ५० Translation - भाषांतर ४१कोणी जन वेंकोबा, कोणी तिमया, असेहि जे म्हणती ।गंगाप्रमुखें तीर्थे करिती तयांकरणे बहु प्रणती ॥२६॥कोणी कान्हकन्हय्या, कोणी रणछोडराय या नावें ।आळवुनि, भक्त तरती, श्रीविष्णो! तुज कसेहि वानावे ॥२७॥वससी प्रकट प्रभु तू श्रीभूयुक्त स्वयें जया स्थानीं ।ज्ञानी ‘वैकुंठचि ते’ म्हणती, धरिती सदैवहि ध्यानीं ॥२८॥४२श्रीवेंकटेशचरणीं रामसुतें या समर्पिल्या आर्या ।कार्या प्रभुभक्तांच्या साधितिल, जशा धरेंदिरा आर्या ॥७॥४३शेषाचलकृतनिवास हा नतभवास गोष्पद करी ।न संकट व्यंकटरमणावरी ॥ध्रु.॥तीन कोस हा पर्वत उंची, लंबि तीस योजने ।तयावरि नांदे भगवज्जने ॥शारदीय नवरात्र, रथोत्सव, नानाविध अर्चना ।लोभवी विविध जनांच्या मनां ॥४४हा व्यंकटपति त्या गिरिवरि अति शोभला ।या पादपंकजीं अनंत जन लोभला ।श्रीरामानुज या देवबळें लाधला ।याहुन जागृत दुसरे दैवत नाही पृथ्वीवरी ।एक हा निजजनदुरिता हरी ॥१॥४५चिंच तिखट नैवेद्य तेलकट, परि सुर झड घालती ।सुधेचे रस त्यापुढे लाजती ॥४६लखलखाट मंडप सुवर्णदीपाळी ।कर्पूर उजळतो असा न जगतीतळीं ।तो ध्वजारोहणानंद न कनकाचळीं ।पुष्करिणीचे स्नान करुनिया सेवा-मंडप दुरी ।पहावा शिरोनि भुवनांतरीं ॥२॥४७सुभक्तवत्सल देऊळगावीं राजाच्या राहुनी ।घेतसे पूजा बहु मानुनी ॥काही काणगी नको कराया, कानगिला घेउनी ।पावतो देतो प्रभु लेहुनी ॥पृथ्वीपतिचा वल्लभ ऐसा पुत्र देतसे गुणी ।इथे हा नवसाला पावुनी ॥४८व्यंकटेशजी नाम चांगले । आवडे मला, चित्त रंगले ।ध्यान मानसीं, लागली प्रिती । पाव गा त्वरें लक्षुमीपती ॥१॥देखिली तुझी दूरुनी पुरी । हर्ष वाटला बहुत अंतरीं ।ध्यान मानसीं, लागली प्रिती । पाव गा त्वरें लक्षुमीपती ॥२॥व्यंकटेशजी स्वामि राजसा । पावसी मला हाचि भर्वसा ।म्हणुनिया तुझी मांडली स्तुती । पाव गा त्वरें लक्षुमीपती ॥३॥व्यंकटेशजी, तूजवेगळें । दीन दीसतो, दावि पाउले ।करुणांतरी भाकिजे किती । पाव गा त्वरें लक्षुमीपती ॥४॥व्यंकटेशजी कूलदेवता । तूंचि श्रीगुरू माउली, पिता ।इष्ट मित्र बंध्वन्न संपती । पाव गा त्वरें लक्षुमीपती ॥५॥४९त्रिभुवनासि या तूचि रक्षिता । शेष शीणला गूण वर्णितां ।वेदही तुझी नेणती स्तुती । पाव गा त्वरें लक्षुमीपती ॥६॥कमलजापती, कमललोचना ॥ कमल श्रीगुरू भक्तरक्षणा ।कमल श्रीगुरू ब्रीद गाजती । पाव गा त्वरें लक्षुमीपती ॥७॥साधना तरी काय मी करू ? भक्ति कोणती सांग हो धरू ? ॥तीर्थयात्रा मी फिरलो किती । पाच गा त्वरें लक्षुमीपती ॥८॥हदय फूटले, कंठ दाटला । नीर लोचनीं, पूर सूटला ।धीर मी धरू मानसीं किती । पाव गा त्वरें लक्षुमीपती ॥९॥उशिर हा तरी फार लागला । मार्ग लक्षितां दीन शीणला ।अझुनिही किती अंत पाहसी । पाव गा त्वरें लक्षुमीपती ॥१०॥५०पृथ्वीवरी सकळ क्षेत्रामाजी पवित्र ।कलियुगीं वेंकटाचल नामक क्षेत्र ॥ध्रु.॥सुवर्णमुखरी-उतरतीरीं आहे डोंगर ।तो वैकुंठासमान, ज्यावरि तीर्थे अपार ॥चतुर्युगीं ज्या मणती वृषगिरि अंजनाद्रिवर ।शेषाचल आणि वेंकटाद्रि मणती सुरवर ॥कृतयुगीं वृषासुर । मातला त्या गिरिवर ।निवटिला शीघ्र मावरें ।यास्तव वृषगिरि मणतीं कृतयुगीं ऐका विस्तार ॥ N/A References : N/A Last Updated : March 13, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP