मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री वेंकटेश्वर| पदे १२१ ते १३० श्री वेंकटेश्वर पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १९० पदे १९१ ते २०० पदे २०१ ते २१० पदे २११ ते २२३ श्री वेंकटेश्वर - पदे १२१ ते १३० श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतल्याने अथवा पाठ केल्याने मनुष्यांस जन्म-मृत्युच्या फेर्यातून मुक्ति मिळते. Tags : balajitirupativenkateshतिरूपतिबालाजीवेंकटेश पदे १२१ ते १३० Translation - भाषांतर १२१हनुमंताचे जन्मकथन । रमायणीं आणिक कथन ।कोणते सत्य म्हणोन । मानावे श्रोतयांनी ? ॥५.६९॥हा विकल्प न धरावा साचार । काळपरत्वें होती अवतार ।जे जे कल्पींचे जैसे चरित्र । तितुके साचार सत्य पै ॥७०॥१२२धन्य धन्य हा पर्वत । पापे पळाली असंख्यात ।ब्राह्मण अनुतापें तेथ । अट्टहासें करीत नामस्मरण ॥६.२९॥विकट पापें नाशित । म्हणोनि व्यंकटाचल नाम सत्य ।ब्राह्मण लोटांगण घालित । आला त्वरित हरीजवळी ॥३१॥नयनीं देखता शेषाचल । सकळ पापां सुटे पळ ।भूवैकुंठ केवळ । कैंचा विटाळ ये ठायीं ॥३४॥१२३जेथे आता उभा घननीळ । श्रीव्यंकटेशस्वामी दयाळ ।तेथेचि होते वारूळ । चोळरायें खणियेले जे ॥९.२५॥गर्तेतुनी निघाले विमान । तेचि देवालय देदीप्यमान ।श्रीव्यंकटेश मनमोहन । तेथे पूर्ण प्रकटला ॥२६॥राजा म्हणे ते वेळीं । श्रीजगन्निवासा, वनमाळी ।तू राहे ये स्थळीं । जेथे उभा आहेसी आता ॥४३॥या वारुळाची जे गर्ता । याच स्वरूपें तत्त्वता ।चिरकाळ लक्ष्मीकांता । उभा राहे तैसाचि ॥४४॥अजूनिही श्रीव्यंकटेश । ते स्थळीं आहे श्रीनिवास ।अद्यापि गर्तेमाजी पाउले राजस । झाकिली, कोणा न दिसती ॥४५॥ते कालीं तेचि मूर्ती । अद्यापि उभा आहे श्रीपती ।भक्तजन डोळां देखती । शेषाचलीं जाउनियां ॥४६॥१२४ऐसा हा श्रीधरवर । श्रीव्यंकटेश दयाकर ।ब्रह्मानंद कृपासमुद्र । तो साचार रक्षी भक्तां ॥१०.६१॥१२५ज्या कुळीं उद्भवलो साचार । तेही ऐका सर्वज्ञ चतुर ।शहापुराहूनि परिकर । पूर्वदिशेस क्रोशावरी ॥१२.६३॥कुडची नामें लघुग्राम । तेथील कर्णिक वृत्ती उत्तम ।शांडिल्य गोत्रज त्याचे नाम । संकरसपंत मूळ पुरुष ॥६४॥१२६ऐसा सद्गुरू चैतन्यघन । गोविंदराज नामाभिधान ।ज्याचे देखता महिमान । गोविंदचि अवतरला ॥१.१८॥जो क्रोधनगभंजन वज्रधर । जो कामगजविदारक हरिवर ।जो अपरोक्षज्ञानाचा सागर । जो मंदिर धैर्याचे ॥१९॥ज्याची ऐकता कवित्वरचना । आश्र्चर्य वाटे सर्वांच्या मनां ।ज्याणें भक्तिबळें नारायणा । आपणाधीन केला असे ॥२०॥ऐसा तो गोविंदराज ॥ नमूनि त्याचे चरणांबुज ।रात्रंदिवस चरणरज । वीर इच्छा करीतसे ॥२१॥१२७आता ऐका सावधान । श्रीवेंकटेशाचे चरित्र गहन ।जे ऐकता भावेंकरून । सर्व मनोरथ पूरती ॥३३॥श्रीवेदव्यास स्वमुखेंकरोनी । बोलिला भाविष्योत्तर पुराणीं ।त्याचा मथितार्थ काढोनी । प्राकृत भाषणीं रचियेले ॥३५॥१२८शतानंद म्हणे राजोत्तमा । ऐक वैकुंठगिरीचा महिमा ।बहुत शोधिता उपमा । दुसरी त्यासी नसेंचि ॥८४॥वैकुंठनायक, मुरारी । तो साक्षात वसे पर्वतावरी ।ज्याचा महिमा ऐकता श्रोत्रीं । पावन होती जडमूढ ॥८५॥सत्यवतीहदयत्न । भविष्योत्तरीं बोलिला गहन ।कलियुगीं वर्तेल माहात्म्य पूर्ण । सर्वकामफलप्रद जे ॥८६॥सकळ यात्रेचे फळ । महामखाचे पुण्य केवळ ।श्रवणमात्रें मनोरथ सकळ । पूर्ण होती तत्काळीं ॥८८॥१२९चैतन्यघना, श्रीनिवसा ॥ श्रीगोविंदा, वैकुंठवासा ।भक्तवत्सल रमाविलासा । मायाधीशा जगत्पते ॥१०२॥तू कृपा करशील जरी । तरी ग्रंथसिद्धी होय निर्धारीं ।श्रीवेंकटेशा शेषाद्रिविहारी । करीं धरी बाळकातें ॥१०३॥श्रीगोविंदपदारविंद । तेथील सेवावया मकरंद ।कुडची वीर होऊनि षट्पद । दिव्य आमोद सेवीतसे ॥१०४॥१३०तू सूत्रधारी सर्वेश्र्वर । कर्ता करविता तूचि समग्र ।जैसे नाचविता सूत्र । बाहुली नाचे तैसेचि ॥३.९६॥वाजविणार नसता बरवा । कैसा वाजेल पोवा ।जगन्निवासा कमलाधवा । तुझे परित्र तू बोलवी ॥९७॥ N/A References : N/A Last Updated : March 13, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP