मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|मनोपदेशपर पदे|
सद्‌गुरु पदी होई रत ॥ मना...

भक्ति गीत कल्पतरू - सद्‌गुरु पदी होई रत ॥ मना...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


सद्‌गुरु पदी होई रत ॥ मना तूं ॥ सद्‌गुरु पदीं होई रत ॥धृ०॥

सद्‌गुरुपद असें अविनाश । होईल तेथे सुख जीवास ।

एकाग्र करीतां हें चित्त ॥मना तूं० ॥ सद्‌गुरु पदीं० ॥१॥

एकाग्र चित्त स्वरुपीं होतां । देहबुद्धीची नुरे अहंता ।

चिद्रूप होय त्वरीत ॥ मना तूं ॥ सद्‌गुरु पदीं. ॥२॥

सद्‌गुरु पदीं आनंद भारी । होशील मुक्त ह्या संसारीं ।

होशी मना तूं शांत ॥मना तूं० ॥सद्‌गुरु पदीं० ॥३॥

सद्‌गुरु सखा जिवलग असुनी । भटकसी कां तूं रानोरानीं ।

कां न कळे तुज हीत ॥मना तूं० ॥ सद्‌गुरु पदीं० ॥४॥

वारी म्हणे बा सांगु किती तुज । जाणुनी घेई अंतरींचें गुज ।

अखंड राही सुखात ॥ मना तूं० ॥सद्‌गुरु पदीं० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP