मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|मनोपदेशपर पदे|
मना तूं पाही , मना तूं पा...

भक्ति गीत कल्पतरू - मना तूं पाही , मना तूं पा...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


मना तूं पाही, मना तूं पाही । संसारीं सुख मुळी नाही ॥धृ०॥

प्रवृत्तीचा मार्ग बिकट । तेथे असती बहुतची कष्ट ।

म्हणुनी तुजला सांगतें स्पष्ट । निवृत्त होई, निवृत्त होई ।

संसारीं सुख मुळी नाही० ॥१॥

जन्ममरण यातायाती । दुःख त्याचें सांगूं किती ।

भ्रमण त्याचें चुकें न कल्पांतीं । चौर्‍यांशी पाही, चौर्‍यांशी पाही ।

संसारीं सुख मुळी नाही० ॥२॥

ऐशा करीतां येरझारा । न मिळे सुखाचा तो वारा ।

सोडी ना तो सगासोयरा । आप्त तेही, आप्त तेही ।

संसारीं सुख मुळी नाही० ॥३॥

ह्यास्तव निवृत्ती मार्ग धरी । त्यांत सौख्य तुज होय भारी ।

स्वानंदाच्या येतील लहरी । सुख मग होई, सुख मग होई ।

संसारीं सुख मुळी नाही० ॥४॥

स्वानंदाचा हाची मार्ग । टाकुनी देई हा अपवर्ग ।

नाही कुणाचा तिथे संसर्ग । तद्रूप होई, तद्रूप होई ।

संसारीं सुख मुळी नाही० ॥५॥

सद्‌गुरु सांगती मार्ग हा नीट । मानु नको त्याचा वीट ।

वारी म्हणे धरी ही वाट । मग भय नाही, मग भय नाही ।

संसारीं सुख मुळी नाही० ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 06, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP