मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|मनोपदेशपर पदे|
झालें पाहिजे ॥ मनारे ॥ ऐस...

भक्ति गीत कल्पतरू - झालें पाहिजे ॥ मनारे ॥ ऐस...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


झालें पाहिजे ॥ मनारे ॥ ऐसें झाले पाहिजे ।

एकी एक होवुनी स्वरुपीं नित्य राहिजे ॥मनारे॥धृ०॥

भज्यभजक हा भाव टाकुनी । द्वैताद्वैत भेद जाळुनी ।

स्वानंदांतची नित्य रंगुनी । राहिलें पाहिजे ॥मनारे॥ऐसे झालें पाहिजे० ॥१॥

एकची वस्तू जगतीं भरली । म्हणुनी तेथे वृत्ती रमली ।

नामरुप ही मिथ्या कळली । सत्य पाहिजे ॥मनारे॥ऐसे झालें पाहिजे० ॥२॥

जी जी वस्तु दिसे दृष्टीला । सत्यची रुप हा अनुभव आला ।

चिद्रूपची हें जाणुनी त्याला । आनंद झाला पाहिजे ॥मनारे॥ऐसें झालें पाहिजे० ॥३॥

वारी म्हणे हें ऐक्य भक्तीचें । लक्षण असेल ज्या भक्ताचें ।

भाग्यवंत ते पूर्ण दैवाचे । कळलें पाहिजे ॥मनारे॥ऐसें झालें पाहिजे० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 06, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP