TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|मनोपदेशपर पदे|
मनारे तुला वाटतें सौख्य व...

भक्ति गीत कल्पतरू - मनारे तुला वाटतें सौख्य व...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


चाल - झंपा

मनारे तुला वाटतें सौख्य व्हावें । तरी अंतरीं श्रीहरीते भजावें ॥धृ०॥

सुख तें अंतरीं, । जाशी तूं बाहेरी । नाकळे जरी तरी ।

शोधुनी पाहावें । म्हणुनी जाई सदा ।

शरण गुरुच्या पदा । नाही मग आपदा ।

सुख घ्यावें । मनारे तुला वाटतें सौख्य व्हावें ॥१॥

सोडुनी चरणा । फिरसी कां वणवण ।

भज त्या नारायणा । ऐक्य भावें ।

सुख ह्या संसारीं नाही तें तीळभरी ।

म्हणुनी तूं श्रीहरी । नित्य गावें ।मनारे तुला० ॥२॥

नाम हें संसारीं । भव हा दुर करी ।

शांतीच्या ओवरी । नित्य राहावें ।

वारी म्हणे नाम तें । देई सुख धाम तें ।

पुरवी मग काम तें । सर्व भावें । मनारे तुला० ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-05-07T01:32:06.3670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

केविल

  • वि. दीन ; ज्याबद्दल कींव , दया उप्तन्न होईल असा ; बापुडा ; विव्हळणारा ( स्वर , मुद्रा इ० ) ' कां मातेनें टाकिलें तान्हें । तें अनाथ दिसे केविलवाणें । ' ' बंधु नको मजकडे केविलवाणा .' - एक ( सं . कृपालु ; प्रा . किवालु ; म . केविल ( कींव )+ वाणा ) 
RANDOM WORD

Did you know?

पंचप्राणांना भोजनापूर्वी आहुती का द्यावी ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Total Pages: 46,537
  • Hindi Pages: 4,555
  • Dictionaries: 44
  • Words in Dictionary: 302,181
  • Marathi Pages: 27,517
  • Tags: 2,685
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,230
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.