मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|मनोपदेशपर पदे|
मना तूं होई लीनरे । सद्‌ग...

भक्ति गीत कल्पतरू - मना तूं होई लीनरे । सद्‌ग...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


मना तूं होई लीनरे । सद्‌गुरुपदीं लीन होवुनी । स्वात्मसुखातें घेईरे ॥धृ०॥

सद्‌गुरुपदीं मारुनी बुडी । स्वानंदाचीं रत्‍नें काढी । अमोल्य रत्‍नें पाहा घडी घडी ।

आहे छानरे । मना तूं० ॥१॥

काढुनी घेई नवरत्‍नांते । गुंफुनी त्यां तूं विवेक हस्तें ।

लक्ष लावुनी एक चित्तें । कंठीं घालीरे ॥

गुरुच्या ॥ कंठीं घालीरे । मना तूं० ॥२॥

कंठीं माळ तूं घालीसी जेव्हा । स्वानंदसुख गुरु देतील तेव्हा ।

सद्‌गुरुकृपा होईल केव्हा ? । होतां पदीं लीन रे । मना तूं० ॥३॥

लीन झालीया सद्‌गुरुनाथ । मुक्त करीती दीन अनाथ ।

वारी म्हणे हें सांगतें सत्य अनुभव घेईरे । मना तूं० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 06, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP