मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|मनोपदेशपर पदे|
मना तूं न दवडी । मना तूं ...

भक्ति गीत कल्पतरू - मना तूं न दवडी । मना तूं ...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


मना तूं न दवडी । मना तूं न दवडी । स्वानंद सुखाची घडी ॥धृ०॥

अखंड स्वरुपीं होई रत । गुंतूं नको रे ह्या विषयांत ।

तेणें तुझा होईल घात । ह्यास्तव सोडी, ह्यास्तव सोडी ।

स्वानंद सुखाची घडी० ॥१॥

अमोल्य आयुश्य जातें वाया । पुनरपी न मिळे नरतनु काया ।

ह्यास्तव शरण जा गुरुपाया । स्वसुख जोडी, स्वसुख जोडी ।

स्वानंद सुखाची घडी० ॥२॥

जातो एक एक क्षण । क्षण नव्हे तो अनर्घ्य रत्‍न ।

वेचिली ती बिनमोलान । घेवुनी विषय कवडी, विषय कवडी ।

स्वानंदसुखाची घडी० ॥३॥

ऐसा नरदेह मिळेना पुन्हा । करुनी घे रे आत्मसाधना ।

वारी म्हणे जन्ममरणा । विचारे तोडी विचारे तोडी ।

स्वानंद सुखाची घडी० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP