मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३| दिव्यांगनेची ओढ संग्रह ३ रतलें परपुरुषाशीं हिंदु विधवेचें मन दे पूर्ण ह्रदय सुंदरी उखळांत दिलें शिर ! काय अतां ! दरडीवरील बाला अंगाई गीत मिळे ग नयनां नयन जरी समजुनि बांध शिदोरी अशांचें कोण करिल तरि काय ? कोण रोधील ? प्रतिज्ञा वसंत फेरीवाला जेव्हां लोचन हे तूं कवण जगांतिल ललना ? रुणुझुणु ये ! समज मानिनी ! उडाला हंस ! नदितिरीं उभी ती ते कांत यापुढें ! पहा हो कसा हा कारागीर ! वाटलें नाथ हो ! सहज तुझी हालचाल केवळ सुखराशी ! तृणाचें पातें स्त्रीह्रदयरहस्य सरस्वती-स्तोत्र निशिदिनिं तुज हरि, ध्याइन का मी ? चरणिं तुझ्या मज देईं रे वास हरी ! चरण कधीं का पाहिन आई ? वंदन व्हावें हरि, मम जीवित हरि, अर्पावें काय तुला मीं ? कलेचें ह्रद्गत म्हातार्या नवरदेवाची तक्रार जय वाल्मीकी ! साम्राज्यवादी कोणिकडे जादुगारिणि ? अजीं ऐका हो सरकार ! कशि लाज सोडिशी सारी ? भोग कुणा सुटले ? सखि आली ! झांशीवाली रिकामे मधुघट हांक स्त्रीला नमस्कार हा ! भैरव एक आकांक्षा वधूवरयोः शुभं भवतु ! अवमानिता कां उभी तूं तरी ! फसवणूक अहो धन्वंतरी ! माळीण गति कशी व्हावी ? गति कशी व्हावी ? स्फुट ओव्या जोगी घेतला जोग माहेरची आठवण माझ्या अंगणांत लाजूं नको ताई ! वाटेच्या वाटसरा आज फिरुनि कां दारिं ? ये पहाटचा तारा गगनीं प्रिया हेंच सर्वस्व ! कुणि असेल ग ! दिव्यांगनेची ओढ पूर्णाहुति दिव्यांगनेची ओढ भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात. Tags : b r tambekavipoemकविताकवीभा रा तांबे दिव्यांगनेची ओढ Translation - भाषांतर "तरुणा जिवा, अंत हें सत्य अत्यंत; कसली वृथा खंत ? करिं मौज घडिची ! १ होई तुला काय ? कां नूर तव जाय ? कसली जिवा हाय ? वद, लागली रे ?" २ "स्वप्नांत सुस्नात दिव्यांगना कांत पाहूनिया भ्रांत हा जीव झाला. ३ लावण्य तें दिव्य सौभाग्य तें भव्य वर्णील कविवर्य कधिं कोण होई ? ४ तीचा जिवा ध्यास, तीचाच हव्यास, तीची सदा आस झुलवी जिवाला. ५ नभिं येइ नक्षत्र, भासे तिचें चित्र. चोखाळ हे नेत्र नच साक्ष देती. ६ येतां उषःकाल प्राची फुले लाल, स्मरती तिचे गाल; परि फोल तेंही. ७ पाहुनि कुसुमास होई तिचा भास; परि तेंहि जीवास माझ्या पटेना" ८ "रे स्वप्न तें स्वप्न ! कां होश उद्विग्न ? हें कोठलें विघ्न ! हें काय मूर्खा ? ९ शोधूनि परिसास हो मात्र परिहास आणील करिं त्यास कुणि जन्मला का?" १० "निंदो अतां कोणि, वंदो अतां कोणि, मज सारखे दोन्हि, मन हें वळेना ११ लाभेल ती खास हा एक विश्वास ! ही एक रे आस आधार जीवा." १२ "तरुणा पिसें सोड, भरलें किती गोड रे ताट तें ओढ जें लभ्य लोकीं." १३ "रे पंजरीं पक्षि तें तें दिलें भक्षि, तो तृप्त; का लक्षि कधिं रानमेवे ? १४ धिग्धिग् ! जिणें व्यर्थ जेथे न पुरुषार्थ, ना स्वार्थ-परमार्थ ! मरणें बरें रे ! १५ कटु मद्य हें गोड, लागे जिवा ओढ, मिळवील ते जोड दिव्यांगनेची." १६ N/A कवी - भा. रा. तांबे जाति - दिव्यांगना ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर दिनांक - १७ मार्च १९३५ Last Updated : October 11, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP