मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
साम्राज्यवादी

साम्राज्यवादी

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


फस्त करी भक्षुनिया सर्व धान्यराशिं हा,

हडुकास्तव वसवस ये, झुंजे इतरांशिं हा. ध्रु०

त्रिभुवनही या न पुरे, खादाडचि हा गिधाड,

कळवळतो वखवखला बापुडा उपाशि हा. १

गिळि अपुलें, गिळि परकें; खाच ती तरी भरे न,

शांतीच्या वर बता, बोंबले अधाशि हा. २

परमुलुखा जाळि, पोळि; लाखांचे खून करी;

न्यायाचा वर तोरा; चोर चढवि फाशिं हा. ३

शास्त्रतटीं तोफ घोर फडशा करि बंधूंचा !

विश्वबंधुता खरि ही रक्षी दुबळ्यांशि हा ! ४

मातिंत राबोनि गरिब धान्याचे रचिति ढीग;

भक्षुनि रक्षक निरिच्छ बोका संन्यासि हा ! ५

धन्य तुझी धर्मात्म्या ! पसरे हा जगड्‌व्याळ !

चिरडी हा पायिं दीन, उन्नति करि खाशि हा ! ६

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - त्रिभुवन

राग - धनाश्री

ठिकाण - लष्कर -ग्वाल्हेर

दिनांक - ८ सप्टेंबर १९२९

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP