३८६
फिरली माधारी वृत्ती पाहूं गेली नारायण झाली येकायेकी ॥१॥
आतां बोलवेना दाटला हे कंठीं । त्याची पडे मिठी प्रेमलोटे ॥२॥
जैसें लवन हैं सिंदूसी मिळालें तेमज केले येकायेकीं ॥३॥
तेणें चैतन्याचा उघडला डोळा वैकुंठी सावळा नारायण ॥४॥
नामयाची जनी मुकुट देवाचे पांडुरंगजीचे नांव साजे ॥५॥

३८७
भक्ती मुक्तीचा कौल दिला जन्म-मरणाचा धाक तुटला ॥१॥
विठ्ठल नामाचें मांडुनिया केगें। न संग ने ये त्यासि अपार उणें ॥२॥
रामनामाची मुद्रा दिधली भक्तिभावें कैसी शाक्षत केली ॥३॥
नामयाची जनी पेचेसी आली केणे भरीती जाली विटेवरी ॥४॥

३८८
माझें मन विठोबाचे पायीं रंगले परतोनि पाहतां मीपण गेलें ॥१॥
नामदेव वस्तू दाखविली कैसी। माया प्रपंचासी विसरले ॥२॥
नामदेवें भक्ती शाश्चत केली विठोबाची मूर्ती हृदयी राहिली ॥३॥
नामाचे जनीस भक्तीचें वेड संसाराचे कोडे सोडविलें ॥४॥

३८९
सावळा गोविंद सावळें हे लेणें। सावळ्यानें मन वेडें केलें ॥१॥
सावळ्याच्या कानीं सावळी कुंडलें। सावळी पाउलें आलिंगिलीं ॥२॥
सावळी कस्तूरी सावळी हे शोभा सावळा का उभा पाहियेला ॥३॥
सावळा तो वेळू सावळी ते गाय। सावळी रखुमाई पाहियेली ॥४॥
जनी म्हणे आतां सावळा भेटून जावें लिंबलोण केलें आजी ॥५॥
मज सावळ्यानें घातियेली मिठी आता माझ्या पोटी, नारायणा ॥६॥
देह माझा देव सावळा गोविंद उभा रे गोविंद नारायण ॥७॥
अंगावरी लोट पूर दाट आला संत हे लावला नारायण ॥८॥
चैतन्यं चेतलें भक्ती मुक्तावली मुलीची माउली नारायण ॥९॥
जनी नामयाची मूर्ती गोविंदाची उभी आनंदाची पंढरीत ॥१०॥

३९०
हाचि नेम माझा न फिरे माघारी राहिले शेजारीं गोविंदाच्या ॥१॥
धन्य माझा जन्म केलें, रे वा, येणें विटेवरी जेणें वस्ती केली ॥२॥
नामयाची जनी भक्तीचें अंजन लाधले निधान विटेवरी ॥३॥

३९१
धन्य सर्व काळ धन्य तो सुदिन धन्य हा निधान ज्ञानदेव ॥१॥
बारा शर्तें अठरा दुर्मुख संवत्सर । तिथी गुरुवासर त्रयोदशी ॥२॥
ऋतु कृष्णपी कार्तिक मास बसे समाधीस ज्ञानराव ॥३॥
नामयाची जनी लागतसे चरणीं । ज्ञानेश्वरी ध्यानीं जपतसे ॥४॥

३९२
धन्य वंश जयाचा वारकरी पंढरीचा ॥१॥
जन्मोजन्मीचा अंकिला। त्यांनी देव ऋषी केला ॥२॥
हाय पितरा उल्हास । यमपुरी नाही त्यास ॥ ३॥
धन्य तयाची जननी म्हणे नामयाची जनी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 10, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP