३५१
जपतप अनुष्ठान । न लगे देहासी दंडण ॥१॥
तुम्हां सांगते मी खूण इथे उभा नारायण ॥२॥
कुंचे ढाळा तयावरी। हरुर्षे नाचतो श्रीहरी ॥३॥
या रे, घालूं दंडवत आला थोर लाभ येथें ॥४॥
बाहे उभारूनी टाळी वाजवितां दोषा होळी ॥५॥
देव कथेसी सांपडे दासी जनी पाया पडे ॥६॥

३५२
टाळ-मृदुंगाची ध्वनी। दिंड्या पताका घेऊनी ॥१॥
संत जाती पंढरीसी । देव सामोरा ये त्यासी ॥२॥
देऊनिया आलिंगन । त्याचा घेतो भागशीण ॥३॥
सर्व तीथांचे माहेर जनी म्हणे पंढरपूर ॥४॥

३५३
तुझे पाय माझी डोई। ऐसे करी विठाबाई ॥१॥
आपुल्या ब्रीदाचा कैवारी विठ्ठल उभा महागरुडपारी ॥२॥
जनी म्हणे शरण आले पाय पाहतां निवाले ॥३॥

३५४
निस्पृहाची मूर्ती सखे, जनी ये अव्यक्ती ॥१॥
भक्त वत्साचिये माय । नामा शिंपी त्याचे पाय ॥२॥
म्हणे जनी दासी माझी सखी आजी होती ॥३॥

३५५
पाणियाचे वाटे। विठो घाली नेटे ॥१॥
घागर घेऊनी हातांत पाणी ओती हंडियांत ॥२॥
ऐसा येरझारा करी भरल्या रांजण घागरी ॥३॥
पाणी पुरे, पांडुरंगा दासी जनीच्या अंतरंगा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 10, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP