३६६
पंढरपूर जग मुक्तींचे माहेर॥धृ॥
आषाडी मासी एकादशी यात्रा दाटे चारी दिवस शंकर डोलतसे कैलासी गिरिजावर ॥१॥
भीमा, चंद्रभागा दोन्ही वाहाती आनंदें करूनी यात्रा उत्तरतसे मधुनी जळ सुंदर ॥२॥
संत सनकादिक येती टाळ मृदुंग वाजती घोष अमरपुरी उमटती । बहू गजर ॥३॥
वंदन वेणुनाद भायें स्नान पद्माळा कराये। दर्शन विठोबांचे घ्यायें। उभा विटेवर ॥४॥
एक वेळ संसारा येउनी पांडुरंग पहावा नयनी जनी ध्यातसे निशिदिनीं । सारंगधर ॥५॥
जग मुक्तींचे माहेर पंढरपूर ॥६॥

३६७
प्रहर एक रात्र उरलियावरी येउनिया शेजारी बैसला जे ॥१॥
उठी यो जनाई, घाली वो दळण आवडीचें गाणें गाऊं दोघे ॥२॥
उठविला मानेखालीं घालुनी हात अंगें नेसवीत लुगड्यासी ॥३॥
दळणाची पाटी अंगें उचलोनी शेजारी बैसोनि दळू लागे ॥४॥
सुखरूप असावी माझी जनी दासी। अंगें मी सेवेसी करीन तिच्या ॥५॥
माझें सर्व काम करी चक्रपाणी । तेथें कैंची जनी नामयाची ॥६॥

३६८
प्रेम क्षमा जया। घडे दंडवत पायां ॥१॥
त्यासी देहभक्ती नुरे स्वात्मसुख डोईवरी ॥२॥
त्या मग समूळ जाला नाहीं। दंडवत जाला पां पायीं ॥३॥
देहावीत अनुणासी म्हणें नव्हे जनी दासी ॥४॥

३६९
लोह जालें सोनें। परिसाचेनि संगें तैसा पांडुरंग जाला मज ॥१॥
युगानुयुग मी तुझी केली सेवा। मोकलीसी, देवा धन्य तुझी ॥२॥
केली जीवासाठी ठाऊक तुम्हांला जाणोनि वा नेणसी तूं ॥३॥
जनी म्हणे जोडी। जन्मोजन्मीं माझी भीड तुझी, देवा राखियेली ॥४॥

३७०
संत आले दारवंटा आपण वाजवतो घंटा ॥१॥
यापासी देव नाहीं । ऐसें जाण लवलाही ॥२॥
करी दंभाची जो पूजा । नाहीं संताहुनी दुजा ॥३॥
न करी संतासी नमन। देवा नाहीं समाधान ॥४॥
अहंकाराची हे करणी । व्यर्थ जाले म्हणे जनी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : August 10, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP