३७१
ज्ञानदेव म्हणे नामदेवाप्रती ऐकावी विनंती एक माझी ॥१॥
पृथ्वीचें हें तीर्थ करावें अंतरी पहावे महंत साधुसंत ॥२॥
जीवन्मुक्त तुज नाहीं कांहीं काज इच्छा आहे मजसाठी यावें ॥३॥
नामदेव म्हणे पुसावें विठ्ठला आज्ञा देतां मला मीही येतों ॥४॥
जनी म्हणे ऐसे बोलोनिया नामा गेले निजधामा राउळासी ॥५॥

३७२
अहो, यशोदेचे घरीं । लीला दाखवी मुरारी ॥१॥
चरणीं नूपुर फणसी वाळे यशोदेचे घरीं खेळे ॥२॥
नारी वाकी मोहनमाळा देव देकीला हो ॥३॥
वाकडा कोटा जति तोडे कैसे बेनिया रहे ॥४॥
हात घेउनिया नवनीत। तो हा यशोदेचा सुत ॥५॥
दृष्ट लागेल गोविंदाला जनी म्हणे माझ्या बाळा ॥६॥

३७३
आनंदाचा निधी दाखविला मज। तेणें चतुर्भुज मन माझे ॥१॥
नामयाचे घरीं जन्म जाला । जन्मांतरीचा ठेवा पिठो देखिला ॥२॥
संत सनकादिक ज्या सुखे थाले ते सुख माझ्या हृदयीं राहिले ॥३॥
साऱ्या चराचरा कळलें नाहीं तें माझ्या हृदयीं बिंबलेसें ॥४॥
नामयाचे जनीस जाहलें सुख देखतां पै मुख विठोबाचें ॥५॥

३७४
उभा माझा हरी देखियला डोळां । सुकुमार सांवळा भेटियेला ॥१॥
सुखाचें अंतर रंगलें हैं चित्त । सदा हरि पाहात नारायण ॥२॥
कृपादृष्टी केली चारी भुजा माते। शंखचक्र हात दोन्ही माझे ॥३॥
मार्गे पुढे उमा मीचि नारायण हातीं सुदर्शन पाहियेला ॥४॥
जनीचिये भेटीमाजी निरंतर सदा कृपादृष्टी भक्तांवरी ॥५॥

३७५
ऐक देवराया, किती विनवूं मी करुणेचा देवो उडी घाली ॥१॥
भिल्लिणीची बोरें उच्चिष्ट भक्षिली। कृपादृष्टी केली तीजवरी ॥२॥
ऐकोनिया तूं, बा, घातियेली उडी गजेन्द्र तांतडी सोडविला ॥३॥
रुक्मांगद राजा करी एकादशी नगरी वैकुंठासी नेली देवें ॥४॥
जनी तुज काय केला, रे अन्याय पांडुरंगा, पाय दावी मानें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : August 10, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP