अभंग ३५६ - ३६०
डॉ. दा. बा. भिंगारकर यांनी संपादित केलेले संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग.
३५६
पंढरीच्या राया। ज्ञान देई नाम गाया ॥१॥
मी तो मूढ तुझी दासी ठाव दे गा, चरणांपासी ॥२॥
तुझे पदरीं पहले खरी माझा सांभाळ करी हरी ॥३॥
लक्ष लाविलें चरणीं म्हणे नामयाची जनी ॥४॥
३५७
वैष्णव कबीर चोखा मेळा महार। निज तो चांभार रोहिदास ॥१॥
सजन पठाणवच्चा तो कसाब वैष्णव ते शुद्ध एकनिष्ठ ॥२॥
कमाल फुलारी मुकुंद झारेकरी जिहीं देवद्वारीं वस्ती केली ॥३॥
वैष्णवांचा राव सखा ज्ञानदेव निवृत्तीचा भाव उघड दावी ॥४॥
वैराग्यशिरोमणी वैष्णव अग्रणी । ते माय बहिणी मुक्ताबाई ॥५॥
राजाई, गोणाई आणि नामदेव वैष्णवांचा राव म्हणवीतसे ॥६॥
त्यासी त्रिभुवन सोवळें वर्तन। सदाकाळ वाचें वनमाळी अखंडित ॥७॥
धैर्याचें संबळी ज्ञानाने संपुष्टी पाऊलें गोमटी विठ्ठलाचीं ॥८॥
आवडीच्या तुलसी वाहिल्या वी भूपदीप सारी जानियेला ॥९॥
सुमन सोऽहं चंदनाचा लेपू अलक्ष्य तो दी लीला ॥१०॥
तो अतीत स्वार्थभक्ताक्ती ॥११॥
जाणा म्हणोनिया अखंड स्मरणा करिताती बाई ॥१२॥
त्या वैष्णवांचे चरणी करा ओवळणी म्हणे दासी जनी शरीराची ॥१३॥
३५८
संत आले महाद्वारीं। चोर पडले देवावरी ॥१॥
नवल जहालें पंढरपुरीं । अखंड वैसे दासी घरीं ॥२॥
जगामध्यें कीर्ती जाली दासी जनी प्रगटली ॥३॥
३५९
ऐसी कृपावंत कोण माझे विठाईवांचोन ॥१॥
ऐसा कोण आहे खासा पदीं बसवीं आपल्या दासा ॥२॥
ऐसा कोण सरदार छत्र धरी दासावर ॥३॥
ऐसा कोण आहे धनी दासी जनीची घाली वेणी ॥४॥
३६०
राजराजेश्वरी अंबा राजराजेश्वरी ॥धृ.॥
अहो अहो अंबाबाई, जीव प्राण तुझे पायीं ॥१॥
तुझ्या नामाचा महिमा वर्णू न शके वेद ब्रह्मा ॥२॥
मज घेतले पदरीं टाकूं नको, माते, दुरी ॥३॥
कृपाळू तू माऊली चित्त द्यावें बोबड्या बोली ॥४॥
तुझे कृपेचे अंकित बोलियले हैं मी उचित ॥५॥
जनी म्हणे मापक अंबा । विचरे चराचर हो अंबा ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : August 10, 2026

TOP