३६१
रामनामावीण अहो ते शरीर त्याचें जो थोरपण येथें ॥१॥
जो त्याचे ध्यान जो ते बोलणें पहिल्या बदन स्नान कीजे ॥२॥
नामयाची जनी म्हणे या पुरुषासी प्रसवली कैसी नेणो त्यातें ॥३॥

३६२
जोड़ते लेकरू माता अंगीकारी। मूढ ते अकेरी काय, देवा ॥१॥
नीच पदी दासी संतांच्या घरीची । महिमा सेवेची लाधलीये ॥२॥
थोराचा सेवक गांजिल्या निर्वाणीं । नावासाठीं धनी धांवा घाली ॥३॥
वेद वाखाणिले स्वामीचे पवाडे अनाथ बापुडे तारियेले ॥४॥
जनी म्हणे आता न विचारी उणे लोह परिसानें शुद्ध केला ॥५॥

३६३
दामाजीचा पाडेवार जाला विठोबा महार ॥१॥
चोखा मेळ्याचिये संगें। मेलें ढोर ओढी अंगें ॥२॥
सेना न्हाव्या उशीर झाला न्हाईपन अंगी ज्याला ॥३॥
दळी कांडी वाहे पाणी। बोले नामयाची जनी ॥४॥

३६४
नरहरी हिरण्यकश्यपास। तोचि श्रीराम रावणास ॥१॥
द्वापारी कृष्ण भाग दास विठ्ठल कलियुग भक्तांसी ॥२॥
तोचि प्रल्हाद दुजा अंगद । तोचि उद्धव भक्त प्रसिद्ध ॥३॥
तोचि हा नामा भाग्य अगाथ। विठ्ठल विहार जयासी ॥४॥
पदिमिनी दासी दे त्या घरी तेचि मंथरा कैकैचे घरीं ॥५॥
तेचि कुब्जा कंस अनुचरी । प्रस्तुत नामा घरीं जनी नामें ॥६॥
एवं जन्मांतर पुरातन विठ्ठला सांगे स्वमुखे करून ॥७॥
सत्य ज्ञानेश्वरा, तुझी आण । म्हणोनि जनी वाहातसे ॥८॥

३६५
पदक काय गेलें निशाणाचें । परी दीनत्व प्रभूचें ॥१॥
तथा रणा येणें लागे। काय सर, वो, माझे ॥२॥
करी आलीस तरेण मानी त्याची सत्ता ॥३॥
जनी म्हणे इषीकेशी वैसा, देवा, तूं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : August 10, 2026

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP