मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग| ३८५ संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग ३५० ३५५ ३६० ३६५ अभंग ३६६- ३७० ३७५ ३८० ३८५ ३९२ अभंग ३८१ - ३८५ डॉ. दा. बा. भिंगारकर यांनी संपादित केलेले संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग. Tags : abhangjanabaiअभंगजनाबाई अभंग ३८१ - ३८५ Translation - भाषांतर ३८१तान्हें वत्स जेवी गाउली लागुनी। तैसे माझे मनीं पंढरीनाथा ॥१॥धन्य माझा जन्म केलें, रे वा येणें विटेवरी जेणें वस्ती केली ॥२॥नामयाचे जनीसी भक्तीचेच वेड साधलें निधान विटेवरी ॥३॥३८२परा मावळली वृत्ती चाळवली विश्रांतीसी आली माय सखी ॥१॥मी तो काहीं नेणे दारवंट्याला लागुनी पाहतांना जगीं भी हारपले ॥२॥मजला कळेना घातले अंजन ने की निधान ब्रह्मरंध्रीं ॥३॥अणूहूनी लहान पोकळीचा देठ तयामाजी भेटे जीवलग ॥४॥जनी गेली तेथे उघडली वेळा कोटी सूर्यकला जन्मा आली ॥५॥३८३परेर्चे अंतर जाणल्याची खूण सदा ब्रह्म जाण नारायण ॥१॥तयापलीकडे शून्याचें देऊळ पुसूनिया स्थळ दावी आतां ॥२॥तयापलीकडे नाग, कूर्म दोन्ही ब्रह्म रुद्रमणी भेटूनिया ॥३॥तथापलीकडे मौनायें शिखर मस्तकीं हा थोर मेरूमणी ॥४॥जनी गेली तेथे फिरली माघारी सत्य म्हणे हरी मीचि आतां ॥५॥३८४पंढरपुराची होईन मी दासी लागली आसोसी विठोपायीं ॥१॥पंढरपुराची होईन मी भोई। विठ्ठल रखुमाई चालतील ॥२॥पंढरपुराची होईन मी वाळू खेळती गोपाळू मायबाप ॥३॥पंढरपुराची होईन मी शेणी पालोनी अंगणीं विठोबाच्या ॥४॥पंढरपुराची होईन मी पायरी येतां जातां हरी चरणी लागे ॥५॥पंढरपुराची होईन मी वाटा येतील अचाट संतजन ॥६॥संतजन येती विठ्ठल भेटीसी नामांकित दासी शरणागत ॥७॥३८५प्रात:काळी उठोनि पाहे। वाकळात निजला आहे ॥१॥काय वाकळाची गोडी । निद्रा लागली, बा बेडी ॥२॥उगवला दिनकर घरी लपलाहे चोर ॥३॥मुख उघडुनि पाहे शंख, चक्र दिसताहे ॥४॥वेड लागले मुकुंदा। दासी जनी सोडी धंदा ॥५॥ N/A References : N/A Last Updated : August 10, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP