मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग| ३८० संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग ३५० ३५५ ३६० ३६५ अभंग ३६६- ३७० ३७५ ३८० ३८५ ३९२ अभंग ३७६ - ३८० डॉ. दा. बा. भिंगारकर यांनी संपादित केलेले संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग. Tags : abhangjanabaiअभंगजनाबाई अभंग ३७६ - ३८० Translation - भाषांतर ३७६ऐक बापा, हृषीकेशी मज ठेवी पायांपाशी ॥१॥तुझें रूप पाहिन डोळां । मुखीं नाम वेळोवेळां ॥२॥हातीं धरील याची लाज । माझें सर्व करी काज ॥३॥जनी म्हणे, देवराया, मज कोणी नाहीं रे सखया ॥४॥३७७कोठे गेला होता उशीर का जाला। आतां तरी आला वेळ जाली ॥१॥कोमेजले का मुख काय चिंता मनीं सांगा, चक्रपाणी, मज आतां ॥२॥कस्तूरीचा टिळा कशाने पुसला चंदन का गेलें होती उटी ॥३॥वैजयंती माळ कशानें तुटली पदक कां भिजलें। घाम आला ॥४॥जनीसाठीं घातियेली उडी येतांना तांतडी । श्रम झाला ॥५॥३७८कौसल्या नवस करिताहे माता राम, आतां माझ्या पोटा बायें ॥१॥नवस पुरवी शेषशायी देवा, वैकुंठीचा द्यावा । पुत्र मज ॥२॥रामचंद्र ऐसा पुत्र जाल्यावरी चढे नमीं गिरी। वैकुंठाची ॥३॥पुरवी मनोरथ येऊनी देऊळा राहीन मी गळा आण तुझी ॥४॥जनी म्हणे आतां निवतील डोळे । बैकुंठीचा खेळे । राम माझा ॥५॥३७९चैतन्याचे डोळे उघडले आजी ब्रह्ममयें पीडले जी एकरूप ॥१॥हेलावला पर झाले नामारंभ। जीवें तो पतंग ज्योती जाली ॥२॥खुंटली हे मती ठक पड़े मना नारायण जाणा उभा राहे ॥३॥वीराले मी जाला । पडीले मोहना पांडुरंग झाला मीचि आतां ॥४॥जनी अणूहूनी। मौनाचे मस्तकीं। भरे तिहीं लोकी । नारायणा ॥५॥३८०ज्योती भरली की जी। आतां नाहीं दुजा भाव ॥१॥मन ठकासी ठकिलें । कृष्ण अक्षरानें लिहिलें ॥ २ ॥झाला सर्वांगाचा डोळा। हरी नामाची ही लीला ॥३॥मज एकांतासी नेलें पुन्हां नाहीं वो, आणिलें ॥४॥जनी नामयाची दासी पांडुरंग भीवरेसी ॥५॥ N/A References : N/A Last Updated : August 10, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP