मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत माणकोजी बोधले| अभंग ७१ ते ८० संत माणकोजी बोधले अभंग १ ते १० अभंग ११ ते २० अभंग २१ ते ३० अभंग ३१ ते ४० अभंग ४१ ते ५० अभंग ५१ ते ६० अभंग ६१ ते ७० अभंग ७१ ते ८० अभंग ८१ ते ९० अभंग ९१ ते १०० संत माणकोजी बोधले महाराजांचे चरित्र भक्ती विजय व बोध लिलावंती ग्रंथात उपलब्ध आहे. अभंग ७१ ते ८० संत माणकोजी बोधले महाराजांचे चरित्र भक्ती विजय व बोध लिलावंती ग्रंथात उपलब्ध आहे. Tags : mankoji bodhalesantमाणकोजी बोधलेसंत अभंग ७१ ते ८० Translation - भाषांतर ७१भक्ताच्या धावया धावसि तु वेगी ।विठोबा तुज मागे रखुमा देवी ॥१॥यादवांसहित कैसा तू धावसी ।स्वामी हृषिकेशी पांडुरंगा ॥२॥बोधला म्हणे हरि ब्रिदे साच करी ।भक्त भाव मुरारी साज तुज ॥३॥७२भक्ति आनंद । मज करी गा नारायणा ।हेचि माझ्या मना आवडी मोठी ॥१॥देवा आवडी मनाची । तुझिये भेटीची ।आणिक कोणाची । नाही चाड ॥२॥जनक जननी । तु आमचा धणी ।ठाव मज चरणी । देई बापा ॥३॥बोधला म्हणे मज । आणिक नाही काज ।तुझीया चरणीचा रज । होईन बापा ॥४॥७३भक्ती भावा ठाव नाही ।कवित्व करी उभे घाई ॥१॥लोकाप्रती वाचितो पोथी पुराण ।आपण भरले आडराने ॥२॥देखत देखत ठाकिती लोका ।आपण घेती लोकांचा थुका ॥३॥हाती घेऊनी फिरवितो माळा ।पन्नास घालुनी कापी गळा ॥४॥त्या चांडाळा मोक्ष नाही ।ते पडती नर्कवाही ॥५॥अंतरी भेदाचे परी ।जीव मारुनी पैसे वरी ॥६॥७४भावाचा भुकेला प्रीतीचा येलाइतू ।हेचि तुझी भक्ती आणिक न लगे काही ॥१॥ऐसा तु कृपाळू पाहे दीनालागी ।भक्ती ज्याचे आंगी ते कृपा तुझी ॥२॥आता तु उदार दीन उध्दरावया ।धने पंढरीराया कृपाळू वा ॥३॥बोधला म्हणे देवा धन्य तुझा महिमा ।स्वामी पुरुषोत्तमा पांडुरंगा ॥४॥७५भावाचा भोक्ता भक्तासी आंगिकार ।आरे तु काज कैवारी अनाथाचा ॥१॥दिनाच्या धावया कैसा तु धावसी ।काहि न पाहसी दोष आमचे ॥२॥आम्ही तव अपराधी । आहा अनंत कोटी ।परि तु धुरजेठी आंगिकारिल ॥३॥बोधला म्हणे जन्मोजन्मी तुझा आखिला ।हा देहे ठेविला तुझे पायी ॥४॥७६महा दोष होत अगणित ।नामे पावत वैकुंठ ॥१॥चला हात धरुनी जाऊ ।माझ्या विठोबाला पाहु ॥२॥भिमा भरली दोनी थड्या ।चला टाकु आत उड्या ॥३॥बांधु नामाची सांगडी ।तेणे उतर पैल थडी ॥४॥विठोबाची झाली भेटी ।दोष निघाले कपाटी ॥५॥बोधला म्हणे करा निर्धार ।हा तो उतरिल पैल पार ॥६॥७७मागिल्या जन्माचा सांगितला विचार ।दाविली साचार साक्ष मज ॥१॥तेंव्हा माझे मन जाले समाधान ।एरवी अनुमान होता मज ॥२॥साक्षतेची पहावा साक्षतेची घ्यावा ।मग समाधान जीवा वाटे थोर ॥३॥बोधला म्हणे नव्हे हे बोधाची कहाणी ।आपले नयनी देखियले ॥४॥७८मी कर्ता म्हणती तया पडली भ्रांती ।व्यापक श्रीपती नेणवेचि ॥१॥बालक उपजोनि लावियेले स्तनी ।सिकविले कोण्ही तयालागी ॥२॥सिकविता ऐक पंढरीनायेक ।त्यावेगळा आणिक नाही कोण्ही ॥३॥बोधला म्हणे देव तया जैसा भाव ।त्या तैसा उपाव करितसे ॥४॥७९मेरु तळवटी पाच पिंपळ ।खाले वरोडा सेंडा वरी मूळ रे ॥१॥पाचाहि पिंपळा एकचि फळ ।त्याणे पक्षि गिळिला समुळ रे ॥२॥ऐक मी सांगेन पक्षियाची सोये ।बाप नाही त्यासा भाये रे ॥३॥हात नाही त्यासी पाय रे ।तो पक्षीविण उडोनिया ये रे ॥४॥त्याने त्रिभुवन गिळिले पाहे रे ।तो विश्वची खेळत आहे रे ।बोधला धरी त्याचे पाय रे ॥५॥८०ये माझ्या मंदिरा विठोबा उदारा ।तोडुनिया थारा अविद्येचा ॥१॥कुवासना कुबुध्दी मुळी हीन छेदी ।अहंकारासी बंदी घालुनिया ॥२॥घालुनी सिंहासन वरी बैसे आपण ।स्वामी हे गुणरत्न पंढरीचे ॥३॥बोधला म्हणे हरि किंकर तुझे द्वारी ।नामक्रीडा करी अखंडित ॥४॥ N/A References : N/A Last Updated : August 09, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP